न्यायालयाच्या आदेशानंतर नायगाव पोलीसांनी गुन्हा दाखल केला


नांदेड(प्रतिनिधी)-धान्य खरेदीमध्ये येवती येथील एका व्यक्तीने घोळ केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर नायगाव पोलीसांनी फसवणुक या सदरात गुन्हा दाखल केला आहे.

राम दिगंबर पाटील उर्फ गायकवाड यांनी न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीनुसार येवती येथील दिलीप बापूराव येवतीकर यांच्यासोबत धान्य खरेदीचे करार करण्यात आले होते. त्यात तुर आणि चना या धान्यांचा समावेश होता. दिलीप येवतीकरने 1 लाख 44 हजार रुपयांचे धान्य खरेदी करून त्याचे पैसे दिले नाहीत.न्यायालयाने आदेश दिल्यानंतर नायगाव पोलीसांनी हा प्रकार गुन्हा क्रमांक 133/2024 नुसार दाखल केला आहे. पुढील तपास श्रेणी पोलीस उपनिरिक्षक वाघमारे यांच्याकडे देण्यात आला आहे.


Post Views: 71






Share this article:
Previous Post: पांढऱ्या शिधापत्रिका धारक कुटूंबांना महात्मा ज्योतीराव फुले व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ मिळणार

June 19, 2024 - In Uncategorized

Next Post: धर्माबाद शहरात 30 तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही

June 19, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.