नौकरीचे पैसे का मागितले म्हणून बेदम मारहाणीत एकाचा मृत्यू

नौकरीचे पैसे का मागितले या कारणावरुन झालेल्या भांडणात बोरफळ( ता. औसा ) येथे एकाचा खुन झाल्याची घटना शुक्रवार दि २८ मे रोजी घडली आहे. चुलत्यास नोकरीचे पैसे का मागितले म्हणून मनात राग धरून वेळूच्या काठीने बेदम मारहाण करून जखमी केले. यामध्ये गोविंद राम यादव वय 38 राहणार बोरफळ ता औसा याचा खून केला असल्याची फिर्याद दिली, यावरून पोलिसांनी एकास अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास बोरफळ येथील नितीन महादेव सुगावे यांच्या शेतात घडली आहे.

याविषयी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आपल्या चुलत्यास नोकरीचे पैसे का मागितले म्हणून याचा राग मनात धरून आरोपी नितीन सुगावे वय २८ वर्षे (रा. बोरफळ ता औसा ) यांनी गोविंद यादव यास काठीने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले यामध्ये गोविंद यादव यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी विकास सतीश यादव यांनी फिर्याद दिली यावरून औसा पोलिसांनी आरोपी नितीन सुगावे यास अटक केली असून, याच्या विरुद्ध कलम 302 भादवी नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी राजीव नवले , पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांनी भेट दिली असून, उपपोलिस निरीक्षक नितीन गायकवाड व पोहेकॉ यादव पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

twelve + 12 =

vip porn full hard cum old indain sex hot