नीट-२०२२ मध्ये मोटेगावकर यांच्या ‘आरसीसी’चा महाराष्ट्रात रेकॉर्डब्रेक रिझल्ट

Read Time:2 Minute, 44 Second

प्रतिनिधी

उच्च वैद्यकीय शिक्षणासाठी अनिवार्य असलेल्या नीट-२०२२ परीक्षेचा निकाल बुधवारी रात्री उशिरा जाहीर झाला. यामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही प्रा. शिवराज मोटेगावकर सर संचालित ‘आरसीसी’ च्या विद्यार्थ्यांनी रेकॉर्ड ब्रेक यश मिळविले आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार ‘आरसीसी’ चे शिलेदारचं सर्वोत्तम ठरले आहेत. यामध्ये ‘आरसीसी’च्या ३६ विद्यार्थ्यांनी ६५० पेक्षा अधिक गुण, १९३ विद्यार्थ्यांनी ६०० पेक्षा अधिक गुण तर तब्बल ९०५ विद्यार्थ्यांनी ५०० पेक्षा अधिक गुण मिळवून नेत्रदीपक यश मिळविले आहे.

मागील तब्बल २२ वर्षांपासून सर्वाधिक डॉक्टर घडविणारी शिक्षण संस्था म्हणून प्रा. शिवराज मोटेगावकर सर संचालित ‘आरसीसी’ चा देशभरात नावलौकिक झाला आहे. प्रा. शिवराज मोटेगावकर आणि संपूर्ण ‘आरसीसी’च्या टीमने घेतलेले ज्ञानदानातील कठोर परिश्रम, विद्यार्थ्यांनी केलेल्या अभ्यासरुपी कष्टाचा बळावर नुकत्याच जाहीर झालेल्या नीट२०२२ मध्येही यशाची परंपरा कायम राखत ‘आरसीसी’ च्या विद्यार्थ्यांनी प्रचंड मोठे यश प्राप्त केले आहे. अद्यापही निकाल येणे सुरू असून लवकरच सर्व निकाल हाती आल्यानंतर ‘आरसीसी’ हीच महाराष्ट्रात सर्वोत्तम ठरणार असल्याचे वर्तविण्यात येत आहे. हाती आलेल्या निकालानुसार ‘आरसीसी’च्या आदित्य केंद्रे, पारस सूर्यवंशी, श्रुती वीर यांनी ७२० गुणांपैकी प्रत्येकी ६९० गुण, हर्षल बोकडे ६८० गुण, सौरभ महाडिक ६७६ गुण यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी ६५० पेक्षा अधिक गुण घेऊन उज्ज्वल असे यश संपादन केले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे ‘आरसीसी’चे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर सर यांच्यासह संपूर्ण फउउ टीमच्या वतीने कौतुक केले
आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

5 × one =