निवडणूक निरीक्षकांची विष्‍णुपूरी इकोफ्रेंडली मतदान केंद्रास भेट


नांदेड,(जिमाका)- नांदेड लोकसभा निवडणुकीचे सामान्‍य निवडणूक निरीक्षक शशांक मिश्र यांनी नांदेड दक्षिणच्या २५३ मतदान केंद्र विष्णुपूरीस आज भेट दिली. संपूर्णतः पर्यावरणपूरक इकोफ्रेंडली मतदान केंद्राची केलेली नैसर्गिक रचना पाहून मिश्रा यांनी या केंद्रावरील मतदान टक्केवारी पूर्वीपेक्षा नक्कीच वाढणार, असा विश्वास व्यक्त केला. या भेटीदरम्यान त्यांनी मतदान केंद्राची तयारी आणि निवडणूक प्रक्रियेची माहिती घेतली.

यावेळी निवडणूक निरीक्षक शशांक मिश्र यांनी मतदान केंद्राचे निरीक्षण केले आणि मतदान अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विकास माने, 087 स्वीप कक्षाचे प्रमुख रुस्तुम आडे, सदस्य संजय भालके, मुख्याध्यापक उज्ज्वला जाधव, दिनेश अमिलकंठवार, ग्राम विकास अधिकारी संजय कानोडे, पर्यवेक्षक शिवाजी वेदपाठक, मतदार विलास हंबर्डे, गोविंदराव हंबर्डे उपस्थित होते.

 

 

 

निवडणूक निरीक्षक शशांक मिश्र यांनी मतदान केंद्रावरील सुविधा, मतदार यादी, मतदान यंत्रे आणि इतर साहित्याची तपासणी केली. मतदान केंद्राची व्यवस्था आणि निवडणूक प्रक्रियेची तयारी पाहून समाधान व्यक्त केले. या भेटीमुळे मतदारांमध्ये निवडणूक प्रक्रियेबाबत विश्वास निर्माण होण्यास मदत होईल. तसेच या भेटीमुळे 16 नांदेड लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण आणि पारदर्शकपणे पार पाडण्यास मदत होईल, असा विश्वास त्‍यांनी व्यक्त केला. या भेटीचे अहवाल लेखन राजेश कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आनंद वळगे, दत्ता केंद्रे, उदय हंबर्डे, विकास दिग्रसकर, मारोती काकडे, पंचफुला नाईनवाड, कांचनमाला पटवे आदींनी परिश्रम घेतले.


Post Views: 64


Share this article:
Previous Post: जागतिक आरोग्य दिनानिमित्त मार्कंड येथे रोगनिदान व उपचार शिबीर संपन्न

April 10, 2024 - In Uncategorized

Next Post: न्यायालयीन प्रक्रियेत घोर गैरवर्तन केले म्हणून उच्च न्यायालयाने एफआयआर रद्द करण्याचा अर्ज दंडासह फेटाळला

April 10, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.