January 19, 2022

निलंबनाची ऑर्डर पाहताच कर्मचा-याची प्रकृती खालावली

Read Time:1 Minute, 14 Second

धुळे : राज्यात अद्यापही एसटी कामगारांचे आंदोलन काही थांबण्याचे नाव घेत नाही आहे. विलीनीकरणाच्या मागणीवर आंदोलक ठाम असून सरकारला अल्टीमेटम देण्यात आला आहे. अशातच शासनानेही आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याचा इशारा दिला आहे. पण असे न झाल्यामुळे आता निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामुळे धुळ्यात मात्र एक धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

धुळे बस आगारातील ३६ कर्मचा-यांना निलंबित करण्यात आल्यानंतर एका चालकाची प्रकृती खालावली. निलंबनाची ऑर्डर पाहिल्यानंतर मनोहर भास्कर पाटील या चालकाची प्रकृती खालावली. त्यांना अचानक भोवळ आल्याने ते त्याठिकाणी खाली कोसळले. जवळच बस आगारप्रमुखांचे कार्यालय असताना, त्यांनी पाटील यांच्या प्रकृतीची साधी विचारपूसही केली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

9 + seventeen =

Close