January 21, 2022

निरोपाच्या दिवशी मराठी साहित्य संमेलनातही कोरोनाची एन्ट्री !

Read Time:2 Minute, 38 Second

नाशिक : येथील भुजबळ नॉलेज सिटीच्या प्रांगणात सुरू असलेल्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या दिवशी पुण्याहून आलेले दोन प्रकाशक कोरोनाबाधित आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या शोधासाठी महापालिकेची धावपळ सुरू झाली आहे. या दोन व्यक्तींना बिटको रुग्णालयामध्ये किंवा पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेला कळवून त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत. साहित्य संमेलनासाठी दररोज हजारो श्रोते तसेच व्हीआयपी व्यक्ती येण्याची शक्यता असल्यामुळे महापालिकेने तपासणीसाठी वैद्यकीय विभागाचे पथक ठेवले होते.

पथकामार्फत शुक्रवार, शनिवार व रविवारी तपासणी केली. दरम्यान, रविवारी सकाळी पुण्याहून आलेल्या दोन पुस्तक प्रकाशकांच्या कोरोना चाचण्या पॉझिटिव्ह आल्यामुळे वैद्यकीय विभागाची धावपळ उडाली. यातील एक पिंपरी-चिंचवड तर दुसरा आळंदी येथील असून आता या प्रकाशकांच्या संपर्कामध्ये आलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जात आहे.
त्यांच्या देखील कोरोना चाचण्या केल्या जाणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली. दरम्यान या दोन्ही कोरोनाबाधित व्यक्तींना तीव्र लक्षणे नसल्यामुळे त्यांना गाडीने घरगुती विलगीकरणासाठी पुण्याला पाठवले जाणार असून त्यांची माहिती पुणे महापालिकेला कळविली जाणार असल्याची माहिती डॉ. विजय देवकर यांनी दिली.

ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आणि ज्यांना कोणतीही लक्षणे नाहीत अशा व्यक्तींना थेट थर्मल स्कॅनिंगद्वारे प्रवेश दिला जात आहे. मात्र ज्यांना लक्षणे आहेत अशा जवळपास १९० लोकांची महापालिकेने तपासणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

5 × four =

Close