
निमा संघटनेची द्विवार्षिक सभा संपन्न वुमेन्स फोरमच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. करुणा जमदाडे तर सचिवपदी डॉ. माया पवार यांची निवड
नांदेड/प्रतिनिधी ः
नुकत्याच संघटनेच्या झालेल्या द्विवार्षीक सभेत महिला फोरमची निवड करण्यात आली. महिला फोरमच्या अध्यक्षपदी डॉ. करुणा जमदाडे यांची तर सचिव म्हणून डॉ. माया पवार यांची आणि डॉ. स्वरूपा जाधव यांची कोषाध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली.
निमा संघटना ही वैद्यकीय क्षेत्रात काम करणारी एक मोठी आणि नावाजलेली संघटना आहे. पूर्ण देशभरात या संघटनेच्या शाखा आहेत. प्रत्येक राज्यातील जिल्ह्या जिल्ह्यात या शाखा उत्तमरितीने काम करतात. वैद्यकीय शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांवर होणार्या अन्याय अत्याचार तसेच खाजगी प्रॅक्टिस करत असताना डॉक्टर मंडळीच्या अडीअडचणी सोडवने, सामाजिक उपक्रम राबवून समाजात आयुर्वेदाविषयी जागृती करणे हा सकारात्मक विचार देणारी ही संघटना आहे. संघटनेचे हे अमृत महोत्सव वर्ष आहे.
कार्यकारिणी पुढील प्रमाणे आहे. उपाध्यक्ष-डॉ. शैलजा उखळकर, डॉ. सुनीता वैजवाडे, डॉ. पुष्पा गायकवाड, डॉ. प्राजक्ता मसलगेकर, सहसचिव- डॉ. प्रतिमा डोनगे, डॉ. जया सगरोळे, डॉ. नेहा बारडकर, डॉ. सविता मामिडवार, उपसचिव – डॉ. अरुंधती बन्नाळिकर, डॉ. शिल्पा पिंपळगावकर, डॉ. विजयालक्ष्मी किणीकर, डॉ. सुरेखा माचेवाड, संघटक – डॉ. सम्राज्ञी पाध्ये, वुमेन्स फोरमन तालुका प्रमुख – नांदेड तालुका डॉ. सविता मदने, डॉ. सविता टाक (अर्धापूर), डॉ. अनिता नाईक (भोकर), डॉ. मंजुषा चव्हाण (नायगाव), डॉ. छाया धुप्पेकर (बिलोली), डॉ. सुरेखा माचेवाड (मुखेड), डॉ. दीपाली तायडे (कंधार), डॉ. सुप्रिया गावंडे (माहूर), डॉ. स्वाती पालीकोंडावार (हादगाव) डॉ. मंजुषा जवलगेकर (लोहा), डॉ. अल्का रकटे (देगलूर), डॉ. स्मिता सावंत (मुदखेड) यांची निवड करण्यात आली. या कार्यकारिणीतील पदाधिकारी आणि सदस्यांचे सर्व सिनियर डॉक्टर्स, डॉ. एस. एम. बंग, डॉ. संजय करवा, डॉ. श्रीराम कल्याणकर, डॉ. डी. लक्ष्मण, डॉ. संजय भक्क्ड, डॉ. विजय सुर्वे, डॉ. अविनाश वडजे, डॉ. संदीप पचलिंग, डॉ. संजय देलमाडे, डॉ. श्रद्धा पांडे, डॉ. सुमेधा बासरकर, डॉ. नरेंद्र कसबे, डॉ. कैलाश भाडेकर, डॉ. दिलीप शिवाल, आणि अनेक सामाजिक संघटनेच्या मित्रमंडळानि त्यांना शुभेच्छा दिल्या.