“…नाहीतर साईबाबावरही सीबीआय आणि ईडीच्या चौकशीचे आदेश दिले जातील”

Read Time:1 Minute, 32 Second

 

 

 

मुंबई | शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून( Samna Editorial) आज पुन्हा एकदा शिंदे- भाजप सरकारवर टीका करण्यात आली आहे. शिर्डीत सध्या फुले विक्रीवरुन वातावरण तापलं आहे. भाविकांना मंदिरात फुले, हार घेऊन जाण्यास मनाई असल्याने यावर अजूनही सरकारने काही निर्णय दिला नाही. याबाबत सामनातून टीका करण्यात आली आहे.

या निर्णयासाठी आता जिल्हाधिकाऱ्यांची (District Collector) एक समिती गठण करण्यात आली आहे. ही समिती आपला अहवाल सादर करेल आणि मग या प्रश्नावर काय ते उत्तर देता येऊल. साईबाबांना हार, तुरे आणि नारळ वाहण्यास परवानगी देण्याचा निर्णय इतका कठीण झालाय का?, असा प्रश्नही सामनातून उपस्थित करण्यात आला आहे.

या निर्णयामुळे गेले अनेक दिवस तेथे असणाऱ्या हार तुरे नारळ व्यापारांचे हाल होत आहेत. यामुळे जर लोक भडकले आणि फुले पेटली तर साईबाबावरही सीबीआय (CBI) आणि ईडीच्या चौकशीचे आदेश दिले जातील, असा टोला सामनातून लगावण्यात आला आहे.


Online NEWS source

Leave a Reply

Your email address will not be published.

sixteen + 8 =