‘…नाहीतर मी हिमालयात जाईन’; चंद्रकांत खैरेंचं मोठं वक्तव्य

Read Time:1 Minute, 57 Second


मुंबई | तुम्ही पन्नासच्या पन्नास पडणार. जनता माफ करत नाही. हे लोक नाही पडले तर माझं नाव बदलून ठेवा. मी हिमालयात जाईन मग. हा शाप आहे आई जगदंबेचा. कारण जनतेला गद्दारी आवडत नाही, असं वक्तव्य शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी केलं आहे.

एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांचं एक चॅटिंग आपल्या हाती लागल्याचा दावा चंद्रकांत खैरे यांनी केलाय. त्यात राज्यातील 36 जिल्ह्यांत 52 खोके वाटून शिंदे गट गर्दी करणार असल्याचं स्पष्ट होतंय, असा आरोप खैरेंनी केलाय.

ज्या बाळासाहेबांनी यांना खाते दिले. महत्त्वाचे खाते दिले. ते उलटले. जनता माफ करत नाही. ज्यानी मोठं केलं त्याला विसरायचं नसतं, असंही खैरे म्हणालेत.

दरम्यान, एका गाडीत 52 सीट असतात. जेवणाचा खर्च 500 रुपये प्रमाणे 26 हजार रुपये होतो एका गाडीचा.
त्यानंतर गाडी भाडे जवळपास 45 हजार रुपये. इतर खर्च 15 हजार रुपये. यात चहा पाण्याच्या बाटल्या वगैरे. असे 86 हजार रुपये खर्च एका गाडीसाठी, असं त्यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

असं भारतीय साम्राज्य ज्याचा विस्तार श्रीलंकेपासून ते थेट कंबोडियापर्यंत होता, आता येतेय फिल्म

राज्यात मध्यवधी निवडणुकांबाबत सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two + four =