नारळ पाणी – फायदे -२

Read Time:10 Minute, 42 Second

नारळपाणी हा निसर्गाचा अदभूत चमत्कार समजला जातो. त्यामुळे नारळात पाणी आणि देवाची करणी असा वाक्यप्रचार प्रचलीत आहे. अत्यंत कठीण कवच असलेल्या शहाळयामध्ये गोड, मधुर आणि भरपूर पौष्टिक घटक असलेले व तहान भागविण्याची क्षमता असलेले थंडगार पाणी असते. या नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेल्या नारळ पाण्यात अनेक आरोग्यदायी गुणधर्म असतात. प्रामुख्याने नारळपाण्यात रोगप्रतिकार क्षमता वाढविण्याचे गुण आहेत. त्यामुळेच की काय आजारी रूग्ण, वृध्द माणसे आणि गरोदर महिलांना नारळपाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. तज्ञाच्या मते नारळपाणी पिण्याची सकाळची वेळ (उपाशी पोटी) अत्यंत चांगली असते. कारण आपल्या शरिराला या वेळी उर्जेची जास्त गरज असते. नियमितपणे नारळपाणी पिल्याने आपल्या शरिरातील अनेक विषारी घटक बाहेर टाकले जातात. ज्यामुळे दिवसभर उल्साहीत व तरतरीत वाटते.

___ नारळाच्या पाण्यात कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, सोडियम, फॉस्फरस, जीवनसत्वे, तंतुमय पदार्थ, खनिजे, इलेक्ट्रोलाईटस इत्यादी पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात. या व्यतिरिक्त ९४ टक्के शुध्द पाणी व चरबीचे प्रमाण कमी असते. त्यामुळे आरोग्यासाठी नारळ पाणी अत्यंत गुणकारी असते. नारळ पाणी हे एक उत्तम प्रकारचे अ‍ॅन्टीऑक्सिडंट सुध्दा आहे. ज्यामुळे आपली रोगप्रतिकार क्षमता वाढण्यास मदत होते व त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या संसर्गजन्य रोगापासून आपल्या शरीराला संरक्षण मिळते. यासाठी प्रत्येक माणसाने अगदी नियमितपणे एक शहाळेकिंवा एक ग्लास नारळ पाणी पिल्याने त्यांच्या आरोग्यावर चांगले परिणाम झालेले दिसून येतात. त्यामुळे व्यायाम अथवा शारीरिक कष्टाची कामे करणा-या लोकांनी नियमितपणे नारळ पाणी पिणे अत्यंत उपयोगी आहे. उपयोग :- १) पाण्याची कमतरता :- नारळ पाण्यात जवळजवळ ९४ टक्के शुध्द व नैसगींक पाणी आहे.

त्यामुळे शहाळयाचे पाणी पिल्यानंतर आपल्या शरीराला पाण्याची कमतरता भासत नाही. नारळपाणी पौष्टिक असून गोड असले तरीही साखर मुक्त आहे. गोड व मधूर चवीच्या नारळ पाण्यात पिष्ठमय पदार्थ, चरबी व कॅलरीज अत्यंत कमी असतात. उन्हातून प्रवास झाला असेलकिंवा अती कष्टाचे काम केले असेल तेंव्हा नारळपाणी घेतल्यास शरीरात झालेली पाण्याची उणिव भरून निघते त्यामुळे नारळपाणी हा थंड पेयासाठी चांगला व आरोग्यदायी पर्याय आहे. २) त्वरीत उर्जा :- नारळ पाणी झटपट उर्जा मिळविण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. व्यायामकिंवा विविध खेळामध्ये जास्त प्रमाणात शारिरीक हालचाली झाल्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासते त्यासाठी नारळपाणी पिल्याने त्वरीत शक्तीकिंवा उर्जा मिळते. शारिरीक हालचालीमुळे शरीरातील इलेक्ट्रोलाईटस कमी होतात. ज्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासते. नारळपाण्यामध्ये खनिजे (पोटॅशियम, मॅग्नेशियम, सोडियम, कॅल्शियम) आणि इलेक्ट्रोलईटस भरपूर असतात. त्यामुळे शरीराला पुरेशी उर्जा पटकन मिळते व शरीर ताजेतवाने होते. ३) पचनसंस्था :- इतर पोषक तत्वाबरोबरच नारळ पाण्यामध्ये तंतुमय पदार्थ जास्त असतात. त्यामुळे चयापचय क्रि या चांगली होऊन बध्दकोष्ठतेची समश्या उद्भवत नाही. नारळ पाण्यात असलेले जैव एन्झाईम अन्नाचे पचन वाढविण्यास मदत करतात. तसेच नारळ पाणी पिल्याने शरीराची सामू पातळी संतुलीत राहते. ज्यामुळे चयापचय क्रिया सुधारते. ४) ऍन्टीऑक्सिडंट :- नारळ पाणी ऍन्टीऑक्सिडंटसने समृध्द असलेले आहे. नारळ पाण्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, सोडियम आणि फॉस्फरस सारखे घटक असतात जे अ‍ॅन्टीऑक्सिडंट सारखे कार्य करतात. ज्यामुळे आपल्या शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढते व आजारासोबत लढा देऊन आपली सुरक्षा वाढवतात. ५) हँग

ओव्हर :- नारळ पाणी हा हँगओव्हर उतरण्यासाठी नैसगीक उपाय आहे. जास्त दारू पिल्यानंतर लोक हँगओव्हर (डोके दुखणे, गरगरणे) होतात. कारण अल्कोहलमुळे शरीराचे निर्जलीकरण होते आणि तसेच शरीरातील इलेक्ट्रोलाईटस् कमी होतात. नारळ पाण्यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाईटस पुन्हा पुर्ववत होऊन दारूची नशा हळु-हळु कमी होऊन हँग ओव्हर नाहिसा होतो. ६) रक्तपुरवठा :- नारळ पाण्यामुळे आपल्या शरीरातील रक्त परिसंचरण सुधारण्यास मदत होते. नारळ पाण्यामध्ये दाहक विरोधी व रक्त पातळ करण्याचे गुणधर्म आहेत. ज्यामुळे रक्त वाहिन्या मधील आजार आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यास फायदा होतो. त्यासाठी नियमितपणे नारळ पाणी पिल्यास रक्त पुरवठा सुरळीत होतो. ७) कोलेस्टेरॉल नियंत्रण :- नारळ पाणी अ‍ॅन्टीऑक्सिडंटचा समृध्द असा स्त्रोत आहे. ज्यामुळे कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहण्यास फायदा होतो. त्याचबरोबर ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि मुक्त रॅडिकल्सचा प्रभाव कमी करण्यास मदत होते. त्यासाठी नियमितपणे नारळपाणी सेवन केल्याने दीर्घ काळापर्यंत उच्च कोलेस्टेरॉलचा स्तर कमी होण्यास मदत होते. ८) लघवी वर्धक :- नारळ पाणी पिल्यामुळे लघवीचे प्रमाण वाढण्यास मदत होते. लघवीचे प्रमाण वाढल्याने सुक्ष्मजंतूच्या संक्रमणापासून संरक्षण मिळते. ज्यामुळे मुत्रमार्गात संक्रमण होण्याची शक्यता कमी होते. त्याचबरोबर लघवी जास्त झाल्यामुळे आपल्या शरीरातील विषारी पदार्थ लघवीद्वारे बाहेर पडतात व मुत्रंिपडाचे आरोग्य चांगले राहते. ९) मळमळ :- प्रामुख्याने गर्भवती महिलांमध्ये गरोदर पणाच्या सुरूवातीच्या पहिल्या व तिस-या महिन्यापर्यंत चक्कर येणे, थकवा वाटणे अथवा मळमळ करणे अशा समश्या असतात. यावर नारळपाणी अत्यंत उपयुक्त नैसगीक औषधी उपाय आहे. नारळपाणी पिल्याने थकवा, मळमळकिंवा चक्कर येणे ही प्रवृत्ती दूर होऊन आराम मिळतो. १०) कमी कॅलरीज :- नारळ पाण्यात नैसर्गीक साखरेचे प्रमाण अत्यल्प असते याशिवाय पिष्ठमय पदार्थाचे प्रमाणही कमी असते.

त्यामुळे दिवसभरात कोणत्याही वेळी नारळ पाणी पिल्यास आपल्या शरीरातील जास्तीचे उष्मांक (उर्जा) वाढत नाही. सामान्यत: एक कप नारळ पाणी पिल्याने आपल्या शरीराला सुमारे ४५ ते ४६ कॅलरीज मिळतात. ज्या इतर फळाच्याकिंवा रसाच्या तुलनेत अत्यंत कमी असतात. ११) उलटया-जुलाब :- नारळ पाण्याचे सेवन उलटया आणि जुलाबावर अत्यंत उपयुक्त आहे. कारण नारळ पाणी पिल्याने आपल्या शरीरातील निर्माण झालेली पाण्याची कमतरता दूर होण्यास मदत होते. नारळ पाणी पिल्याने पोटात होणारी जळजळकिंवा अल्सर (जखमा) सुध्दा कमी होतात, त्यासाठी नारळ पाण्यात ंिलबाचा रस मिसलन दोन ते तीन दिवस नियमित पणे पिल्यास उलटया व जुलाब कमी होऊन आराम मिळतो. १२) शरीर डिटॉक्स :- नारळ पाण्यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण भरपुर असते. पोटॅशियममुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते त्यामुळे पोट स्वच्छ होऊन पोटाचे आरोग्य चांगले राहते व तसेच पचनसंस्था सुधारण्यास फायदा होतो. त्यासाठी नियमितपणे नारळ पाणी पिल्याने संपूर्ण शरिराचे आरोग्य चांगले राहण्यास फायदा होतो. १३) केसांची मजबती :- नारळ पाण्यामध्ये जीवनसत्वे, खनिजे आणि अमिनो आम्लासारखी पोषक घटक असतात. ज्यामुळे टालचा भाग उत्तेजीत होऊन केस मजबूत व चमकदार होतात.

-प्रा. डॉ. ज्ञानोबा एस. जाधव
कळंब, मोबा. ९४२३३ ४२२२९

Leave a Reply

Your email address will not be published.

three + 7 =