नारळाच्या झाडावर एक बिबट्या, खालून दुसरा बिबट्या… लोकांची तंतरली

Read Time:1 Minute, 31 Second


नाशिक | नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील एक काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर आला आहे. एका शेतात एक बिबट्या नारळाच्या झाडावर चढलेला दिसत आहे. नंतर तो बिबट्या झाडावरुन खाली उतरण्याचा प्रयत्न करत असल्याचं देखील दिसत आहे. हा व्हिडीओ तिथंच असलेल्या एका व्यक्तीनं कॅमेऱ्यात कैद केला आहे.

दुसरीकडे तो बिबट्या झाडावरुन खाली उतरत नाही तेवढ्यात दुसरा बिबट्या त्याच्यावर खालून हल्ला करतो आणि हे दोन्ही बिबटे वाऱ्याच्या वेगानं पुन्हा त्या नारळाच्या झाडावर चढतात. काळजाचा थरकाप उडवणारा हा व्हिडीओ आहे. ही दृश्यं पाहून लोकांच्या तोंडचं पाणी पळालं आहे.

दरम्यान, आता हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. खालील लिंकवर क्लिक करुन व्हिडीओ पाहा-

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.

15 + 20 =