August 19, 2022

नांदेड संत्रागाची एक्सप्रेस रद्द!

Read Time:1 Minute, 29 Second

नांदेड दिनांक १६- नांदेड-संत्रागच्ची-नांदेड एक्स्प्रेस च्या दोन फेऱ्या रद्द करण्यात आल्याचे नांदेड रेल्वे विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
बिलासपुर विभागात खारसिया-रोबर्स्तन सेक्शन दरम्यान रेल्वे उड्डाण पुलाचे काम करण्याकरीता नॉन-इंटरलॉक वर्किंग सुरु करण्यात आल्यामुळे नांदेड-संत्रागच्ची-नांदेड एक्स्प्रेस च्या दोन फेऱ्या रद्द करण्यात आल्याचे बिलासपुर विभागाकडून सांगण्यात येते.
नांदेड येथून सुटणारी गाडी क्र. १२७६७ हजूर साहिब नांदेड – संबलपुर एक्स्प्रेस दिनांक १७ आणि २४ जानेवारी, २०२२ रोजी हि गाडी रद्द करण्यात आली आहे तर संत्रागाच्ची येथून सुटणारी गाडी क्र.१२७६८ संत्रागाच्ची ते हजूर साहिब नांदेड हि गाडी दिनांक १९ आणि २६ जानेवारी, २०२२ रोजी रद्द करण्यात आली आहे.
प्रवाशांना होणाऱ्या असुविधे बद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगीरी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

fifteen + six =

Close