नांदेड विभागाला सहा कोटींचा फटका

Read Time:2 Minute, 43 Second

दरवर्षी दिवाळी सन उत्सवापूर्वी एसटी कर्मचारी यांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन होत असतात. यावेळी दि.२७ नोव्हेंबर रोजी विविध मागण्यासाठी एसटी महामंडळाच्या कृती समितीकडून आंदोलनाची हाक देण्यात आली होती.महागाई भत्ता व इतर किरकोळ मागण्या शासनाने मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.परंतु दोनच दिवसानंतर एसटी महामंडळाचे शासनाने विलीनीकरण करून घ्यावे या मागणीसाठी संपुर्ण राज्यात काम बंद आंदोलन सुरू केली.प्रारंभी एसटी कर्मचारी एक दोन दिवसासाठी आंदोलन करुन पुन्हा कामावर हजर होतील असा अनेकांचा समज होता. परंतु यंदा पहिल्यांदाच एसटी कर्मचारी संघटनांनी आंदोलन रेटून धरले आहे. मागील बारा दिवसापासून सुरु असलेल्या या संपात नांदेड विभागाच्या नऊ आगारातील जवळपास ३ हजार २०० कर्मचारी सहभागी झाले आहेत.

विभागीय कार्यालय,नांदेड आगारासह जिल्हयातील सर्वच आगारात कर्मचारी उपोषणास बसले आहेत.सतत तोटयात चालणा-या एसटीला दिवाळीच्या उत्सव काळात वर्षभरात सर्वांधिक उत्पन्न मिळते.यंदा नांदेड विभागास दररोज ५० लाख रूपयांचे उत्पन्न अपेक्षित होते.मात्र गेल्या बारा दिवसापासून नऊ आगारातील एसटीची चाके जागेवरच रूतली आहेत.यामुळे नांदेड विभागास जवळपास सहा कोटी रूपयांचा फटका बसला असून आधीच तोटयात चालणा-या एसटीला दुष्काळात तेरावा महिना म्हणण्याची वेळ आली आहे.तर ऐन दिवाळीत कर्मचा-यांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे नागरिकांना प्रंचड गैरसोयीचा सामना करावा लागला.एवढेच नव्हे तर बहिणीला भाऊबीजेच्या सणापासून वंचित राहावे लागले.एसटीची प्रवाशी वाहतुक बंद असल्याने नागरिकांना खासगी वाहनांचा सहारा घ्यावा लागत आहे.मात्र येथे मोठया प्रमाणात आर्थीक पिळवणूक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

18 − 13 =