नांदेड रेल्वे विभागातील कुठल्याही रेल्वे गाडीमध्ये तसेच रेल्वे स्थानकावर गर्दीसारखी स्थिती नाही- उपिंदर सिंघ 

Read Time:3 Minute, 32 Second

नांदेड रेल्वे विभागातून धावणाऱ्या कुठल्याही गाडीत तसेच रेल्वे स्थानकावर गर्दीसारखी परिस्थिती नाही. सोशिअल मिडियामध्ये गेल्या वर्षीचे काही विडीयो पसरविल्या जात आहेत. जे चुकीचे आहेत. कोविड-१९ च्या प्रभावापूर्वी नांदेड रल्वे विभागात सरासरी एक लाख १० हजार प्रवाशी दररोज प्रवास करत होते ते आत्ताच्या परिस्थितीत फक्त सात हजार ५०० एवढे कमी झाले आहे. तेंव्हा गर्दीच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. अशे आवाहन नांदेड विभागाीय व्यवस्थापक उपिंदरसिंग यांनी केले आहे.

नांदेड रेल्वे विभागात सर्व रेल्वे गाड्या सुरळीत पणे सुरु आहेत. आज घडीला नांदेड रेल्वे विभागातून ८० रेल्वे गाड्या धावत आहेत. यातील ४६ गाड्या नांदेड रेल्वे विभागातून निघतात तर ३४ गाड्या नांदेड रेल्वे विभागातून जातात. या सर्व रेल्वे गाड्या पूर्ण आरक्षित आहेत. त्यामुळे गाडीमध्ये आरक्षण असलेल्या प्रवाशालाच प्रवेश दिला जातोय. तसेच नांदेड रेल्वे विभागातील २४ रेल्वे स्थानकावर जेथे या गाड्यांना थांबा आहे तेथे  प्रवाशांनी गर्दी करू नये म्हणून फलाट फोर्म तिकिटांचा दर तात्पुरता वाढवून ३० रुपये करण्यात आला आहे.  रेल्वे स्थानकावर तसेच रेल्वे गाड्यामध्ये प्रवाशांना कोविड प्रोटोकोल चे पालन करण्याकरिता आर. पी. एफ. आणि तिकीट तपासनीस वारंवार सांगत आसतात. तसेच याची उद्घोषणा ही करण्यात येते. काही रेल्वेस्थानकावर थर्मल स्क्रीनिंग मशीन सुधा बसवण्यात आले आहे.

श्री सिंघ यांनी पुढे सांगितले कि या वर्षी ता. पाच जानेवारीला सुरु झालेल्या किसान रेल्वेला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ता. सात एप्रिलपर्यंत धावलेल्या १२१ किसान रेल्वे ने ४० हजार ९५ टन कांदा, द्राक्षे आणि टरबूज देशात विविध ठिकाणी पाठविण्यात आले आहेत. तसेच मालटेकडी, परभणी, बासमत, आदिलाबाद, हिंगोली, वाशीम, जालना, शिवानी शिवापूर आदी स्थानकावरुन ही मालवाहतूक वाढविण्यात आली आहे. या कामी नांदेड रेल्वे विभागामध्ये बिजिनेस डेव्हलप मेन्ट युनिट खूप चांगले कार्य करत आहे. ज्याला कुणाला रेल्वेने मालवाहतूक करायची असेल त्यांनी श्री रविकांत, सहायक वाणिज्य अधिकारी -९७३०४७१९५२ यांच्याशी संपर्क करावा.

Leave a Reply

Your email address will not be published.

3 × four =