August 19, 2022

नांदेड ते विशाखापटनम उन्हाळी विशेष रेल्वे

Read Time:1 Minute, 54 Second

नांदेड – उन्हाळ्याच्या हंगामात अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी, दक्षिण मध्य रेल्वे नांदेड – विशाखापट्टणम – नांदेड दरम्यान दोन उन्हाळी विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत

गाडी क्रमांक ०७०८२ नांदेड ते विशाखापटनम ही रेल्वे शुक्रवारी दिनांक २० मे रोजी दुपारी चार वाजून 30 मिनिटांनी नांदेड रेल्वे स्थानकातून सुटेल व दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजून 30 मिनिटांनी विशाखापटनम येथे पोहोचणार आहे. तर गाडी क्रमांक ०७०८३ विशाखापटनम ते हुजूर साहेब नांदेड ही रेल्वे दिनांक 22 मे रोजी सायंकाळी ०६.२० मिनिटांनी विशाखापटनम येथून निघेल व दुसरे दिवशी दुपारी तीन वाजून दहा मिनिटांनी नांदेड येथे पोहोचणार आहे.

या विशेष गाड्या मुदखेड, बासर , निजामाबाद, कामारेड्डी, सिकंदराबाद, काझीपेठ, वारंगल, खम्मम, रायनापुडू, एलुरु, ताडेपल्लीगिदेम, राजमुंद्री, समलकोट, अन्नावरम, अनकापल्ले आणि दुव्वाडा स्थानकावर दोन्ही दिशेने थांबतील.

या गाड्यांमध्ये एसी २ टियर, एसी ३ टियर, स्लीपर आणि सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे आहेत.प्रवाशांनी याची नोंद घ्यावी अशी माहिती दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयाने कळविले आहे

Leave a Reply

Your email address will not be published.

four + 18 =

Close