June 29, 2022

नांदेड जिल्ह्यात 45 व्यक्ती कोरोना बाधित

Read Time:1 Minute, 28 Second
नांदेड जिल्ह्यात 45 व्यक्ती कोरोना बाधित तर एक कोरोना बाधित झाला बरा
नांदेड (जिमाका) दि. 5 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 32 अहवालापैकी 45 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 41 तर अँटिजेन तपासणीद्वारे 4 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 646 एवढी झाली असून यातील 87 हजार 888 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 103 रुग्ण उपचार घेत असून 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

18 − four =

Close