June 29, 2022

नांदेड जिल्ह्यात १ हजार ४ व्यक्ती कोरोना बाधित वाढले

Read Time:7 Minute, 4 Second

नांदेड : जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या ४ हजार ४१६ अहवालापैकी १ हजार ४ अहवाल कोरोना बाधित आले आहेत. २९ जणांचा मागील तीन दिवसांत मृत्यू झाला आहे.तर १ हजार ३६४ कोरोना बाधित झाले बरे झाल्याने रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली. गेल्या आठवडाभरापासून बाधितांची संख्या घटत आहे.नव्या रूग्णात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ७५३ तर अँटिजेन तपासणीद्वारे २५१ अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या ७७ हजार ९३२ एवढी झाली असून यातील ६३ हजार ७८२ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे.

आजच्या घडीला १२ हजार ४०५ रुग्ण उपचार घेत असून २४९ बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

दिनांक २५ ते २७ एप्रिल या तीन दिवसांच्या कालावधीत २९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या १ हजार ४८३ एवढी झाली आहे. दिनांक २५ एप्रिल रोजी मुखेड कोविड रुग्णालय मुखेड तालुक्यातील सकनुर येथील ५० वर्षाचा पुरुष, व्हिजन रुग्णालय येथील एस.व्ही.एम कॉलोनी किनवट येथील ४५ वर्षाचा पुरुष, मुदखेड तालुक्यातील डोणगाव येथील ६० वषार्चा पुरुष, झेंडा चौक नांदेड येथील ६४ वषार्चा पुरुष, अपेक्षा रुग्णालय येथील आशीर्वाद नगर नांदेड येथील ६४ वषार्चा पुरुष दिनांक २६ एप्रिल रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथील भोकर तालुक्यातील धामदरी येथील ५० वषार्चा पुरुष, मुदखेड तालुक्यातील धनज येथील ६५ वषार्चा पुरुष, मुदखेड येथील ४७ वर्षार्ची महिला, सिडको नांदेड येथील ८२ वषार्ची महिला, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे कंधार तालुक्यातील शिराढोण येथील ८५ वषार्ची महिला, पाक्जा नगर नांदेड येथील ६५ वर्षार्ची महिला,हदगाव तालुक्यातील ठाकूरवाडी येथील ५५ वर्षाचा पुरुष, धमार्बाद येथील ५५ वषार्ची महिला, सापंच नगर नांदेड येथील ५९ वषार्ची महिला, भोकर येथील ६५ वर्षार्ची महिला, नायगाव तालुक्यातील कोकलेगाव येथील ६५ वषार्ची महिला, लोहा कोविड रुग्णालय येथे टेळकी तालुका लोहा येथील ६० वर्षार्ची महिला, देगलूर कोविड रुग्णालय येथे शहापूर तालुका देगलूर येथील ७१ वर्षार्ची महिला, गोदावरी कोविड रुगणालय येथे नाईक नगर नांदेड येथील ६७ वर्षाचा पुरुष, फिनिक्स कोविड रुग्णालय येथे आशीर्वाद नगर नांदेड येथील ६५ वर्षाचा पुरुष, डेल्टा रुग्णालय येथे हदगाव तालुक्यातील रुई येथील ४५ वषार्चा पुरुष दिनांक २७ एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे गोपालचावडी तालुका नांदेड येथील ४५ वर्षाचा पुरुष, नांदेड येथील ६६ वषार्चा पुरुष, किनवट कोविड रुग्णालय येथे किनवट तालुक्यातील इस्लापूर येथील ७१ वर्षाचा पुरुष, हदगाव कोविड रुगणालय येथे हदगाव येथील ६० वर्षार्चा पुरुष, साईकृपा रुग्णालय येथे भोकर तालुक्यातील सावरगाव येथील ६५ वर्षाचा पुरुष, तिरुमला रुग्णालय येथे तरोडा नाका नांदेड येथील ६५ वर्षाचा पुरुष, निमार्या रुग्णालय येथे गणेशनगर नांदेड येथील ७२ वषार्ची महिला, श्री गणेश रुग्णालय येथे देगलूर येथील ५९ वषार्ची महिला यांचा समावेश आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.८४ टक्के आहे.

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा १५३, बिलोली १२, हिमायतनगर १६, माहूर ८, नांदेड ग्रामीण २१, देगलूर ३३, कंधार ४७, मुदखेड ३८, अधार्पूर ३५, धमार्बाद २२, किनवट ७०, मुखेड ७०, भोकर ३, हदगाव ९९, लोहा २१, नायगाव ६६, उमरी ६, परभणी ५, हिंगोली १५, पुणे १, यवतमाळ ६, निर्मल ३, लातूर ३ असे एकूण ७५३ बाधित आढळले.

आजच्या बाधितांमध्ये अ‍ॅन्टिजेन तपासणीद्वारे मनपा क्षेत्रात २४, बिलोली १, उमरी १, माहूर ९, उसमानाबाद १, नांदेड ग्रामीण ४, देगलूर ४, कंधार १६, मुदखेड ४१, हिंगोली ४, अधार्पूर ४, धमार्बाद ६७, किनवट ३८, मुखेड १२, परभणी ३, भोकर ६, हदगाव ४, लोहा ८, नायगाव ३, नाशिक १ व्यक्ती असे एकूण अँन्टिजेन तपासणीद्वारे २५१ बाधित आढळले.

Leave a Reply

Your email address will not be published.

2 − one =

Close