नांदेड जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस

Read Time:6 Minute, 47 Second

नांदेड : हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार रविवारी दुपारी २ वाजल्यापासुन शहरासह जिल्ह्यात विजेच्या कडाख्यासह वादळी पाऊस झाला. त्यात भोकर तालुक्यातील चितगीरी येथे विज कोसळून ३ म्हैस, ४ शेळ्या ठार झाल्या तर १२ शेळ्या जखमी झाल्या आहेत. तर नांदेड तालुक्यातील गंगाबेट येथे विज अंगावर पडल्यामुळे एका बैलाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यात विजेच्या कडाख्यासह वादळी पाऊस झाल्यामुळे अनेकवेळ विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. अर्धापूर तालुक्यातही वादळी पावसामुळे फळ पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. दुपारी ४ वाजताच्या दरम्यान शहरातील अनेक भागात विजेच्या कडाख्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली.

विजपडुन गंगाबेट येथे बैल ठार…
अचानक आलेल्या मेघगर्जनेसह झालेल्या पावसात ग्रामीण पोलीस स्टेशन हदीतील गंगाबेट येथील शेतकरी शंकर आडगावकर यांच्या शेतातील एक बैल विज पडुन ठार झाल्याची घटना २ मे रोजी सायंकाळी पाच चा सुमारास घडली असून या घटनेची माहिती पोलीस पाटील शिवाजी सोनटक्के यांनी तहसलीदार ,तलाठी,मंडळ निरीक्षक यांना भ्रमनधवनी वरून दिली आहे.या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी पोलीस पाटील सोनटक्के यांनी दिलेल्या माहितीनुसार, २ मे रोजी सायंकाळी, अचानक वातरण ढगाळ झाले होते व विजेचा गडगडाट व मुसळधार पावसामुळे शेतातील जनावरे उभी असतांनाच अचानक विजेचा गडगडाट. झाला यात गंगाबेट परिसरातील शंकर रंगनाथराव आडगावकर यांच्या शेतातील उभ्या असलेल्या जोडी पैकी एका बैलावर विज कोसळुन एक बैल ठार झाला. पोलीस पाटील यांनी सांगितले असुन ग्रामीण पोलीस स्टेशन येथे माहिती दिली असल्याचे सांगितले. सदरील घटनेत अंदाजे साठ हजार रुपये किंमतीचा बैल दगावल्याचे समजते.या घटनेमुळे गंगाबेट परिसरात खळबळ उडाली आहे.

भोकर तालुक्यात वीज कोसळून ३ म्हशी ,४ शेळ्या ठार तर १२ जखमी
तालुक्यात २ मे रोजी दुपारी वा-्यासह जोरदार पाऊस बरसला . या दरम्यान वीज पडून तालुक्यातील चिदगीरी येथील एका शेतक-्याच्या दोन म्हशी तर पोमनाळा येथील ४ शेळ्या दगावल्या असून १२ शेळ्या जखमी झाल्या असल्याची माहिती भोकर महसूल कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे. हवामानातील बदलांमुळे दुपारनंतर वेगवान वा-्यासह अचानक सुरू झालेल्या पावसामुळे परिसरातील शेतक-्यांची मोठी धावपळ झाली . विजांच्या कडकडाटासह जोरदार बरसलेल्या पावसा दरम्यान पोमनाळा येथील भवानी माता मंदीराजवळील शेतात दुपारी ३:०० वाजता वीज पडल्याने बाबू यशवंता सुर्यवंशी यांच्या २ शेळ्या दगावल्या असून ८ शेळ्या जखमी झाल्या आहेत . त्याचबरोबर गोविंद रामा मोरे यांच्या २ शेळ्या दगावल्या तर ४ शेळ्या जखमी झाल्या आहेत. या घटनेची माहिती मिळताच मंडळ अधिकारी महेश वाकडे यांच्या मार्फत घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा करण्यात आला आहे.

दरम्यान तालुक्यातील चिदगीरी येथेही वीज पडून तीन म्हशी दगावल्या असून या ठिकाणी संबंधीत सज्जाच्या तलाठी व मंडळ अधिकारी महेश वाकडे स्वत: पाहणी करून पंचनामा करणार आहेत सदरील घटनेतील मृत जनांवरांचे पोस्टमार्टम संबंधीत विभागामार्फत दि . ३ मे करण्यात येणार आहे.

अधार्पूर तालुक्यात अवकाळी पाऊस ; उन्हाळी ज्वारीचे नुकसान
तालुक्यात रविवारी सायंकाळी अचानक तुफान वादळ वा-्यासह अवकाळी पाऊस सुरू झाला. या पावसामुळे शेतातील काढणीला आलेल्या उन्हाळी ज्वारीचे नुकसान झाले. तर वाऱ्यामुळे केळीची पाने फाटून काही झाडे आडवी पडली आहेत. तसेच वादळ वा-्यामुळे विद्युत यंत्रणा कोलमडली असून तालुका अंधारात आहे.

रविवारी सायंकाळी चार वाजताचे सुमारास अधार्पूर तालुक्यातील मालेगाव, लहान, लोणी, येळेगाव, पार्डी, पिंपळगाव, दाभड, भोकरफाटा आदी भागांत तुफान वादळ वा-्यासह जोरदार अवकाळी पाऊस सुरू झाला. अचानक सुरू झालेल्या या अवकाळी पावसामुळे शेतक-्यांच्या शेतात वाळत टाकलेली हळद आणि काही शेतक-यांनी कापून टाकलेली उन्हाळी ज्वारी भिजून काहीअंशी नुकसान झाले आहे. तसेच तुफान वा-्याच्या वेगाने विद्युत यंत्रणा कोलमडली असून तालुक्यातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. शेतातील केळीची झाडे आडवी पडली आहेत. तर पाने फाटून केळीच्या बागाचे नुकसान झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

18 + 17 =