नांदेड जिल्ह्यात पावसाचा कहर

Read Time:5 Minute, 16 Second

नांदेड: नांदेडसह जिल्ह्यामध्ये सोमवार सायंकाळपासून पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे नदी, नाले दुथडी भरुन वाहत आहेत. मुखेड येथे एक कार पुराच्या पाण्यात वाहून गेली. त्यातील दोघांपैकी एकाने झाडाचा साहरा घेतला तर दोघेजण वाहून गेली आहेत. तसेच नरसी फाटा येथील बालाजी मंदिराला पाण्याने वेढले आहे.

नदी नाल्यांचे पाणी गावात घुसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे. विष्णुपुरी प्रकल्प पूर्णक्षमतेने भरला आहेत्यामुळे विष्णुपुरी प्रकल्पाचे १३ दरवाजे उघडले असून त्यातून १ लाख क्युसेस पाण्याचा विसर्ग गोदावरी पात्रात सोडल्या जात आहे. परिणामी गोदावरी दुथडी भरुन वाहत असून गोवर्धनघाटची स्मशानभूमि तसेच नावघाटचा पुल पाण्याखाली गेला आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. महापालिका प्रशासन काल सायंकाळपासूनच सज्ज आहे. दरम्यान महापालिका कर्मचा-यांनी दोघांना पुरातून वाचवले असून आयुक्त डॉ.सुनील लहाने, अतिरिक्त आयुक्त मनोहरे, उपायुक्त संधू यांची टिम कामाला लागली आहे.

लोहा तालुक्यात मुसळधार पाऊस
लोहा : दोन दिवसात पाण्याने हाहाकार माजवला असून लोहा तालुक्यातील सर्वच भागांमध्ये पावसाने हजेरी लावली होती त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरूच आहे तर पाऊसामुळे ग्रामीण भागातील नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत मोठ्या प्रमाणात पिके वाहून गेल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे तर काही गावांमध्ये गावात पाणी शिरल्यामुळे अनेक मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यावर त्वरित पंचनामे करून शासनाने मदत जाहीर करावी अशी मागणी जनतेतून होते. लोहा तालुक्यातील काही गावांमध्ये पुलावरून पाणी जात असल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे त्यासाठी नागरिक अडकले असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्यामुळे अनेक छोट्या मोठ्या नद्या वाहत आहे तर नदी-नाले तुडुंब भरले आहेत त्यामध्ये धावरी, बेरळी, रायवाडी, मलकापूर, आज वाडी, गोलेगाव , माळाकोळी ,माळेगाव, पांगरी, बोरगाव, आडगाव, हिप्परगा, शेलगाव ,मस्की पार्टी या ठिकाणी पावसाने कहर केला असल्याची माहिती मिळत आहे तर लोहा शहरांमध्ये अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे अनेकांची नुकसान झाले आहे अनेकांना आता पाण्या जीव मुठीत घेऊन घरात बसावे लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

कासराळीत घरात पाणी शिरले
बिलोली : सोमवार पासुन सुरु झालेल्या पावसामुळे मंगळवारी हाहाकार माजवला असून सततधार पावसामुळे तालुक्यातील कासराळी येथील म्याकलोड,कुंभार,खाटीक गल्लीतील घरात पाणी शिरल्याने घरातील अन्न,धान्या सह कपडे,जिवणाशक सर्व वस्तुचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने येथील लोकांचा संसार उध्वस्त झाला असून खाण्या पिण्यास घरात काहीही शिल्लक उरले नसल्याने यांच्या वर उपास मारीची वेळ आली यामुळे तात्पुरते निवारण म्हणून ग्राम पंचायतीने राहण्याची व जेवण्याची व्यवस्था जिल्हा परिषद शाळेत करुन या पिढीतांना थोडाफार दिलासा दिला.तर या पावसामुळे कासराळी च्या पुलावर पाणी आल्याने नांदेड हैद्राबाद हाय वे सकाळ पासून दुपारी तिन पर्यत तरि बंदच होता यामुळे शेकडो वाहणांच्या रांगा लागल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published.

nine + 2 =