नांदेड जिल्ह्यात दुचाकी चोरट्यांचा धुमाकुळ

Read Time:4 Minute, 55 Second

नांदेड : पोलिसांना गुंगारा देत चोरट्यांनी हातोहात दुचाकी लंपास करित पुन्हा धुमाकुळ सुरू केला आहे.मागिल दोन दिवसात जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनेत चोंरट्यांनी सहा दुचाकी पळवल्या आहेत.यामुळे नागरिकांत असुरक्षितेचे वातारवण पसरले आहे. पंधरा विस दिवसापुर्वी पोलिसांनी काही दुचाकी चोरांना पकडले होते.मात्र आता दुसरी टोळी सक्रिय झाली आहे.

मागील अनेक महिन्यापासून जिल्ह्यात दुचाकी चोरीचे सत्र सुरुच असून दररोज किमान दोन ते चार दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना घडत आहेत. लॉकडाऊन काळात चोरट्यांनी रस्त्यावरील दुचाकींना लक्ष केले असून चोरटे दिवसा ढवळ्याही दुचाकींच्या चो-या करताना दिसत आहेत. दरम्यान मागील दोन दिवसात जिल्ह्यातून सहा दुचाकी चोरीला गेल्याची नोंद झाली असून पहिल्या घटनेत नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत फीर्यादी सिद्धीकी रियाज इकबाल यांची एमएच २६ यु २१९६ ही हिरोहोंडा स्प्लेंडर कंपनीची दुचाकी गाडी चंदासिंग कॉर्नर जवळील मुंजाजी पेट्रोलपंपाच्या पार्कींग मधून अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. जिची किंमत १५ हजार रुपये एवढी होती.

तर दुस-या घटनेत रामतिर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून नरसी येथून फिर्यादी पंढरी निवृत्ती सूर्यवंशी यांच्या घरासमोरुन दुचाकी क्रमांक एमएच२६ झेड १७६५ ही २५ हजार किंमतीची गाडी चोरीला गेली. तिस-या घटनेत उस्माननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून कंधार तालुक्यातील मौजे हळदा येथे फिर्यादी सुधाकर विनायक शिंदे यांची दुचाकी क्रमांक एमएच२६ एक्यु ८४७७ ही बजाज प्लॅटीना कंपनीची गाडी चोरट्यांनी लंपास केली. जिची किंमत २० हजार रुपये एवढी होती. तर अन्य एका घटनेत नांदेड येथील भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून भावसार चौक येथून फिर्यादी उषा गंगाळे यांची स्कूटी क्रमांक एमएच२६ बीटी ५८९१ ही गाडी अज्ञात चोरट्यांनी घरासमोरुन हँडललॉक तोडुन चोरट्यांनी चोरुन नेली. जिची किंमत ४० हजार रुपये एवढी आहे.

तर अन्य एका घटनेत नायगाव शहरातील फिर्यादी गणेश तळने यांच्या घराच्या समोर उभी असलेली दुचाकी क्रमांक एमएच२६ एई ९१३७ ही दुचाकी चोरट्यांनी दारासमोर कुणी नसल्याचा फायदा घेत चोरुन नेली. जिची किंमत २५ हजार रुपये एवढी आहे. तर सहाव्या घटनेत नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एमआयडीसी परिसरातील साईदत्त मंगलकार्यालयासमोरुन फिर्यादी सुरेशराव खाडे रा.वैभवनगर यांची दुचाकी क्रमांक एमएच २६ डब्लु ९४५६ ही फॅशनप्रो हिरोहोंड कंपनीची गाडी गेट समोर केली असता अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली. दरम्यान सुरेशराव खाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात अज्ञा आरोपि विरुध्द दुचाकी चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला असून याप्रकरणी अधिक तपास पोहेकॉ केंद्रे हे करीत आहेत.जिल्ह्यात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनात वाढ झाली असून रस्त्याच्याकडेला दुचाकी लावण्यासही दुचाकी स्वारांना भिती वाटत आहे. त्यामुळे सदरील दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा कायमचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी जिल्ह्यातील होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

nine + fifteen =