नांदेड जिल्ह्यात आज 1 हजार 330 व्यक्ती कोरोना बाधित ; दहा जणांचा मृत्यू ; अनावश्यक घराबाहेर न पडण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 23 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 5 हजार 473 अहवालापैकी 1 हजार 330 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 699 तर अँटिजेन तपासणीद्वारे 631 अहवाल बाधित आले आहेत. आता जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या 34 हजार 337 एवढी झाली आहे.
रविवार 21 मार्च 2021 रोजी कैलासनगर नांदेड येथील 49 वर्षाच्या एका पुरुषाचा, हदगाव येथील द्रोणागिरीनगर येथील 85 व 48 वर्षाच्या दोन महिलेचा, राज कॉर्नर नांदेड येथील 80 वर्षाच्या एका पुरुषाचा, मिलत्तनगर नांदेड येथील 60 वर्षाच्या एका पुरुषाचा, लोहा तालुक्यातील बोरगाव येथील 80 वर्षाच्या एका महिलेचा शासकिय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे तर सोमवार 22 मार्च रोजी विनायकनगर नांदेड येथील 72 वर्षाच्या एका महिलेचा व मंगळवार 23 मार्च रोजी हदगाव येथील 79 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे तर सोमवार 22 मार्च रोजी राजकॉर्नर नांदेड येथील 80 वर्षाच्या एका पुरुषाचा, विद्युतनगर नांदेड येथील 75 वर्षाच्या एका महिलेचा खासजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत्त रुग्णांची संख्या 668 एवढी झाली आहे.
आजच्या 5 हजार 473 अहवालापैकी 4 हजार 38 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 34 हजार 337 एवढी झाली असून यातील 26 हजार 293 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 7 हजार 144 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 59 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

10 + 7 =

vip porn full hard cum old indain sex hot