नांदेड जिल्ह्यात अतिगंभीर रुग्णांचे प्रमाण वाढले; रविवारी १८ बाधितांचा मृत्यू, 1310 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह 

Read Time:3 Minute, 32 Second

नव्याने प्राप्त होत असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या अहवालात पॉझिटिव्ह रुग्णांची नवी अकडेवारी आणि त्या सोबतच अतिगंभीर रुग्णांच्या मृत्यूचे वाढत असलेले प्रमाण यामुळे नांदेड जिल्हा राज्यातील दहा शहराच्या कोरोना हॉटस्पॉटच्या यादीत पोहचले आहे. त्यासोबतच नांदेड जिल्ह्यात अतिगंभीर रुग्णांच्या प्रमाणात देखील सर्वाधिक वाढ झाली आहे.

शनिवारी (ता.२७) तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅब अहवालापैकी रविवारी (ता.२८) चार हजार २९९ अहवाल प्राप्त झाले. यामधील दोन हजार ८५० निगेटिव्ह तर एक हजार ३१० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ३९ हजार ९०८ इतकी झाली आहे.

आत्तापर्यंत जिल्ह्यात ७३१ बाधितांचा मृत्यू 

रविवारी चिखलवाडी नांदेड पुरुष (वय ७४), सिद्धीविनायक अपार्टमेंट नांदेड महिला (वय ५८), चितळी तालुका लोहा महिला (वय ६०), इंदिरा नगर लोहा पुरुष (वय ५५), सिडको नांदेड पुरुष (वय २५) बोरगाव ता. लोहा पुरुष (वय ६५), तरोडा (बु.) पुरुष (वय ७६), बळीरामपूर पुरुष (वय ५०), होळी नांदेड पुरुष (वय ८२) या नऊ बाधितांवर विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयात, हिंगोली नाका नांदेड पुरुष (वय २९), भोकर पुरुष (वय ५२), आंबेडकरनगर नांदेड महिला (वय ६५), भगतसिंग रोड नांदेड पुरुष (वय ८५), गुरुद्वारा गेट नं.चार महिला (वय ५०) या पाच बाधितांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात, दिलिपसिंग कॉलनी पुरुष (वय ७०) यांच्यावर शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय तर पाथरड ता. हदगाव महिला (वय ६०), तामसा ता. हदगाव महिला (वय ५०) यांच्यावर हदगाव कोविड सेंटरमध्ये तर पूर्णा रोड नांदेड पुरुष (वय ४८) या रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. वरील १८ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आत्तापर्यंत जिल्ह्यात ७३१ बाधितांचा मृत्यू झाला आहे.

एक हजार ३१० जणांचे अहवाल 

रविवारी नांदेड वाघाळा महापालिकेंतर्गत -८१० , नांदेड ग्रामीण -२८, लोहा -६६, कंधार -३८, मुदखेड -२६, बिलोली-१५, हिमायतनगर -२६, माहूर -आठ, उमरी -२९ , देगलूर -५२, भोकर -१४, नायगाव -२१, धर्माबाद -नऊ, अर्धापूर -३१, किनवट -५०, मुखेड -२१, हदगाव -५३, परभणी -सहा व हिंगोली – दोन, आदीलाबाद – दोन, यवतमाळ – तीन असे एक हजार ३१० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

twelve − three =