नांदेड जिल्ह्यातील 9 पोलीस अंमलदार आता झाले श्रेणी पोलीस उपनिरिक्षक


नांदेड(प्रतिनिधी)- पोलीस दलामध्ये एकूण 30 वर्ष सेवापुर्ण केलेले आणि सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक या पदावर किमान 3 वर्ष सेवा पुर्ण केलेल्या सर्व पोलीस अंमलदारांना आश्वासित प्रगती योजनेनुसार पोलीस उपनिरिक्षक श्रेणी देणे आवश्यक आहे. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी 13 जून रोजी जारी केलेल्या आदेशानुसार नांदेड जिल्ह्यातील 9 सहाय्यक पोलीस उपनिरिक्षकांना या आदेशानंतर श्रेणी पोलीस उपनिरिक्षक असे संबोधीत करण्यात येईल असे आदेश जारी करण्यात आले आहेत.

औरंगाबाद येथील सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक लोहिया यांनी हे प्रकरण लावून धरले होते. त्यानंतर या संदर्भाने अनेक प्रकरणे न्यायालायत गेली, सुकानु समितीकडे गेली आणि अखेर हा निर्णय जाहीर करण्यात आला की, आश्वासीत प्रगती पदोन्नती योजनेनुसार राज्यातील पोलीस अंमलदारांना 30 वर्षाची सेवा पुर्ण केल्यानंतर श्रेणी पोलीस उपनिरिक्षक हे पद देण्यात येईल.

नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी जिल्ह्यातील 9 सहाय्यक पोलीस उपनिरिक्षकांना या आदेशानंतर श्रेणी पोलीस उपनिरिक्षक संबोधीत करण्यात यावे असे आदेश जारी केले आहेत. श्रेणी पोलीस उपनिरिक्षक झालेले सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक पुढील प्रमाणे आहेत. त्यांची सध्याची नियुक्ती कंसात लिहिलेली आहे. शंकर रावसाहेब देशमुख, विठ्ठल केशवराव खेडकर, विठ्ठल एकनाथराव कत्ते (पोलीस मुख्यालय), सय्यद मझर अली सय्यद मोईनअली, सय्यद मझर हुसेन महम्मद जाफर हुसेन(नियंत्रण कक्ष), सादत अली करामत अली(मोटर परिवहन विभाग), बाबू रघुनाथ हिमगिरे(नायगाव), सुनिल बाबुराव सुर्यवंशी (लिंबगाव) असे आहेत.


Post Views: 202


Share this article:
Previous Post: डाॅ.आकाश देशमुख यांच्या कार्याची एक हृदयस्पर्शी आठवण

June 13, 2024 - In Uncategorized

Next Post: 315 पोलीस अंमलदारांचे शुक्रवारी सकाळी 7 वाजल्यापासून पोलीस अधिक्षक कार्यालयात समुपदेशन होणार

June 13, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.