August 19, 2022

नांदेड जिल्ह्यातील निबंर्धांत मिळाली सूट

Read Time:4 Minute, 57 Second

नांदेड : ब्रेक दि चेन अंतर्गत शासनाने दिलेल्या नव्या निर्देशा प्रमाणे नांदेड जिल्ह्यांतील निबंर्धांमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे.यात सर्व अत्यावश्यक व अत्यावश्यक नसलेली दुकाने,शॉपींग मॉल दि.३ ऑगस्टपासून सोमवार ते शुक्रवारपर्यंत दररोज रात्री ८ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी राहणार आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी आदेश काढले आहेत. तर चित्रपटगृहे, नाट्यगृहे, तसेच मॉल्समधील मल्टीप्लेक्स आणि सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे बंदच राहणार आहेत.

राज्यातील अनेक जिल्हयासह नांदेड जिल्हयात कोरोनाची लाट ओसरली आहे.या अनुषंगाने राज्य शासनाने तिस-या पातळीत निबर्धांत सुट दिली आहे.या अंतर्गत जिल्हयातील परिस्थितीनूसार जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी जिल्ह्यातील निबंर्धांमध्ये सुट दिल्याचे आदेश काढले आहेत.या आदेशानूसार जिल्हयातील सर्व प्रकारचे जीवनावश्यक वस्तू तसेच जीवनावश्यक वस्तू विक्री न करणारी दुकाने तसेच मॉल्स सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत आणि शनिवारी दुपारी ३ पर्यंत सुरु राहतील. रविवारी जीवनावश्यक वगळता इतर सर्व दुकाने आणि मॉल्स बंद राहतील.

सर्व सार्वजनिक उद्याने, मैदाने व्यायाम, चालणे, धावणे , सायकलिंग आदींसाठी खुले करण्यात आले आहेत. सर्व शासकीय व खासगी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरु ठेवणार. प्रवासाची गर्दी टाळण्यासाठी कार्यालयीन वेळांची विभागणी करण्याची सुचना जी कार्यालये वर्क फ्रॉम होम पद्धतीने सुरु ठेवता येऊ शकतात ती तशी सुरु ठेवण्याची सुचना.

सर्व प्रकारची शेतीविषयक कामे, बांधकाम, वस्तूंची वाहतूक, उद्योग हे पूर्ण क्षमतेने सुरु राहतील. जिम, व्यायामशाळा, योगा केंद्र, ब्युटी पार्लर्स, केश कर्तनालय यांनी वातानुकूलन वापरायचे नसून, सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवता येतील. शनिवारी दुपारी ३ पर्यंत आणि रविवारी पूर्ण बंद राहतील.

चित्रपटगृहे, नाट्यगृहे, तसेच मॉल्समधील मल्टीप्लेक्स हे बंद राहतील. यात कोणतीही सुट नाही. सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे बंदच राहतील.शाळा, महाविद्यालयांच्याबाबतीत शालेय शिक्षण व उच्च शिक्षण विभाग निर्णय घेईल. सर्व उपाहारगृहे ५० टक्के आसन क्षमतेसह सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील. मात्र आरोग्याच्या कोविडविषयक नियमांचे पालन करावे लागेल. टेक अवे किंवा पार्सल सेवा सध्याप्रमाणे सुरु ठेवता येईल. रात्री ९ ते सकाळी ५ या वेळेत अत्यावश्यक कारणांशिवाय बाहेर पडता येणार नाही.

विविध कार्यक्रमांवर निर्बंध कायम
गर्दीमुळे संसर्ग वाढू नये म्हणून वाढदिवस समारंभ, राजकीय सामाजिक, सांस्कृतिक समारंभ, निवडणुका, प्रचार, मिरवणुका, निदर्शन मोर्चे यांच्यावरील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत मास्क वापरणे, सुरक्षित अंतर यासारखे कोरोना प्रतिबंधक नियम सर्व नागरिकांनी पाळणे गरजेचे आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, साथरोग कायदा, आणि भारतीय दंड संहितेमधील तरतुदीनुसार कारवाई केली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published.

three × 1 =

Close