May 19, 2022

नांदेड जिल्हयातील दुकाने आता सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत सुरू राहणार

Read Time:6 Minute, 5 Second

नांदेड : संपुर्ण राज्यात दि.१५ जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.परंतू शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे नांदेड जिल्हयातील कोरोनाचा पॉझिटीव्हीटी दर काही प्रमाणात कमी झाल्यामुळे जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी नांदेडकरांना थोडासा दिलासा दिला आहे.जिल्हाधिकारी यांनी सोमवारी काढलेल्या नव्या आदेशानूसार आता जिल्हयातील अत्यावश्यक सेवेतील व या सेवेत मोडत नसलेल्या दुकानांना सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा दिली आहे.

ब्रेक द चैन अंतर्गत नांदेड जिल्हयात दि.३१ मे पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले होतेग़ेल्या महिन्याभरापासून नांदेड जिल्हयातील कोरोनाचा आलेख घटला आहे. मृत्यु दर व रूग्ण संख्या कमी झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहेक़ोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू नये यासाठी राज्य शासनाने राज्यात १५ जूनपर्यंत लॉकडाऊनची मुदत वाढविली आहे.परंतू ब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार १५ जूनच्या सकाळी ७ पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात आले आहेत.यासाठीचे अधिकार जिल्हाधिकारी स्तरावर देण्यात आले आहेत. l

पॉझिटीव्हीटी दर १० टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या जिल्हे व पालिकांसाठी शिथीलता देण्यात आली आहे. शासनाच्या निर्देशानूसार जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी दि.३१ मे रोजी काढलेल्या नव्या आदेशाप्रमाणे नांदेडकरांना थोडासा दिलसा दिला आहे.या आदेशाप्रमाणे जिल्हयातील सर्व आवश्यक वस्तू व सेवांची दुकाने जी सध्या सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरु आहेत, ती सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरु ठेवता येणार आहेत.तर सर्व आवश्यक गटात नसलेल्या इतर दुकानांना उघडणे आणि त्यांच्या वेळा ( केवळ एकल दुकाने. मॉल्स किंवा शॉपिंग सेन्टर्स नव्हे) दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरु ठेवता येतील.

– आवश्यक गटातील दुकानाच्या वेळेप्रमाणेच त्यांच्या वेळा असतील तसेच शनिवार , रविवार ती बंद राहतील. अशा भागांत आवश्यक वस्तूंच्या जोडीने आवश्यक नसलेल्या वस्तू देखील ई कॉमर्स माध्यमातून वितरीत करता येतील.

दुपारी ३ नंतर मात्र वैद्यकीय किंवा इतर आणीबाणीच्या प्रसंगांव्यतिरिक्त येण्या जाण्यावर निर्बंध असतील. कोरोनाविषयक कामे करणा-या कार्यालयांव्यतिरिक्त इतर सर्व शासकीय कार्यालये ही २५ टक्के कर्मचारी उपस्थितीनिशी सुरु राहतील. आवश्यक सेवा,वस्तूची दुकाने आता नव्या आदेशाप्रमाणे सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत सुरू ठेवता येणार आहेत.मात्र याचे उल्लंघन केल्यास कारवाई सामोरे जावे लागणार आहे.

कृषिविषयक दुकाने संपुर्ण आठवड सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत सुरु राहतील. दुकानांना पुरवठा केल्या जाणारा वस्तूंच्या वाहतुकीवर निर्बंध नाहीत. हे पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात येते.

मात्र, दुकानांना ठरवून दिलेल्या वेळेनंतर ग्राहकांना विक्री करता येणार नाही. या नियमांचा भंग केल्यास दुकान कोरोना साथ जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत बंद ठेवण्यात येईल. निश्चित केलेल्या वेळेनुसार होम डिलिव्हरी सुरूच राहतील,असे या आदेशात नमुद केले आहे.

व्यापा-यांची मागणी फेटाळली
शासनाच्या प्रत्येक आदेशाचे व्यापारी पालन करून सहकार्य करित आहे. परंतू गेल्या ६ महिन्यापासून व्यापार बंद असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.यामुळे व्यापा-यांच्या मानसिक व आर्थीक परिस्थितीचा अभ्यास करून दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी व्यापारी असोशियसनने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. मात्र ही मागणी फेटाळण्यात आली आहे. यामुळे व्यापा-यांची निराशा झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

5 + 7 =

Close