July 1, 2022

नांदेडात पावसाचे तांडव

Read Time:7 Minute, 10 Second

नांदेड : परतीच्या पावसाने शहरासह जिल्ह्यास झोडपून काढले असून सोमवारी रात्रभर झालेल्या मुसळधार पाऊस झाला.पुन्हा दुस-या दिवशी मंगळवारी दिवसभर पावसाने तांडव घातले. यामुळे पुर परिस्थिती निर्माण होऊन शहर जलमय झाले आहे.यामुळे नदी काठच्या भागात राहणा-या नागरि वस्त्यामधतील शेकडो नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरले आहे. या नागरिकांना महापालिकेने सुरक्षित स्थळी हलविण्यास सुरुवात केली आहे. तर पाण्याची आवक वाढल्याने विष्णुपुरी प्रकल्पाचे १० दरवाजे उघडले असून त्यातुन १ लाख ३७,०१८ क्युसेक विसर्ग सुरु आहे.

परतीचा पाऊस गेल्या चारपाच दिवसात सक्रीय झाला आहे. यात हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजा नुसार सोमवार दि.२७ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीपासून शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. पुन्हा दुस-या दिवशी मंगळवार दि.२८ रोजी सकाळपासूनच पाऊस सुरू झाला.यानंतर दुपारपर्यंत पावसाचे तांडव सुरू झाले ते रात्री उशीरापर्यंत सुरू होते. यापावसामुळे शहरातील अनेक नागरी वस्त्या जलमय झाल्या आहेत. हिंगोली गेट, साठे चौक, महाविर चौक, वजिराबाद चौरस्ता, आनंदनगर, वर्कशॉप कॉर्नर, शेतकरी चौक तरोडा नाका, सिडको लातूर फाटा यासह शहरातील अनेक चौकासह नागरि वस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले असून पुर परिस्थिती निर्माण झाली आहे.विष्णुनगर,वसंत नगर,नदीकाठच्या गोवर्धन घाट,खडकपुरा, श्रावस्तीनगर तेहरा नगर,ब्रम्हपुरी, देगलूर नाका जुने नांदेड यासह अनेक भागातील शेकडो नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरले.

तर नावघाट पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. जुनामोंढा भागातही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. तर गाडेगाव येथील आसनापुलावरुन पाणी वाहत आहे. यामुळे वाहतूकीसाठी हा मार्ग बंद करण्यात आला आहे. या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदी तुंडूंब भरुन वाहत आहे. दरम्यान नदी काठच्या वस्तीतील नागरिकांना महानगर पालिकेच्या वतीने सहा ठिकाणी निवारा केंद्राची सोय करण्यात आली आहे. त्यात गाडीपुरा येथील गांधी राष्ट्रीय विद्यालय, किल्ला रोड येथे झोन अधिकारी बाशेट्टी यांच्याशी नागरिकांनी संपर्क साधावा, लिबर्टी फंक्शन हॉल येथे दिलीप टाकळीकर नोडल अधिकारी यांची नेमणुक करण्यात आली आहे. एनटीसी मील येथे कलीम पसरवेज यांची नेमणुक करण्यात आली आहे. आंध्रा समिती शाळा येथे महेंद्र पवार हे अधिकारी काम पाहत आहेत. प्रतिभा निकेतन शाळा होळी येथे राजे पताळे यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

महापौर येवनकर यांच्याकडून पाहणी
नांदेड शहरात अतिवृष्टीमुळे नदीकाठी व सखल भागात पाणी शिरल्याने महापौर मोहिनी विजय येवनकर यांनी खडकपूरा,गोकूळनगर, श्रावस्तीनगर,गोवर्धन घाट,राम घाट,दासगणू पूल व देगलूरनाका जूना पूल भाग पाहणी करून नागरिक यांच्याशी संवाद साधला. अधिका-यांना महापालिका यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना दिल्या. य्तसेच आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी निवारा केंद्रास भेट दिली. तर ग्रामीण भागात आ.बालाजी कल्याणकर यांनी भेटी देवून नागरिकांशी संवाद साधला.
नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
विष्णुपूरी प्रकल्पातून सोडलेल्या विसगार्मुळे पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाल्याने नदीकाठच्या पैनगंगा, पूर्णा, मांजरा या नदीकाठच्या गावातील सर्व नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
विष्णपुरी प्रकल्पाच्या १० दरव्याजातून १,३७,०१८ क्युसेक विसर्ग सुरु आहे. निम्न दुधना प्रकल्पातून ३०,३२४ क्युसेक विसर्ग पूर्णा नदीपात्रात सुरु आहे. माजलगाव प्रकल्पातून ८०,५३४ क्युसेक विसर्ग सुरु आहे. पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी व सिद्धेश्वर पाणलोट क्षेत्रात पूर्णा नदीत २३,३०० क्युसेक विसर्ग सुरु आहे. सिद्धेश्वर धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पूर्णा ब्रीज जवळ ७१,६०० क्युसेक विसर्ग सुरु आहे. इशारा पाणी पातळी ३५१.00 मी. तर धोका पातळी ३५४.00 मी. इतकी वाढली आहे. गोदावरी नदीतून विष्णुपूरी बंधा-यात मागील प्रकल्पातून ३,00,000 क्युसेक विसर्ग टप्या टप्याने प्रवाहीत होणार आहे. त्यामुळे जुन्या पुलावरील धोक्याची पाणी पातळी ३५४.00 मी. ने वाढण्याची शक्यता आहे. इशारा पातळीचा विसर्ग २,१३,000 क्युसेक व धोका पातळीचा विसर्ग ३,0९,७७४ क्युसेक आहे. उर्ध्व पैनगंगा धरण १०० टक्के भरल्याने धरणाचे पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने तेथील ११ दरवाजे उघडून १८,७९१ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. अशी माहिती नांदेड पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता बी.के.शेटे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

3 × two =

Close