नांदेडमध्ये मतदार चिठ्ठी वाटप गतीने सुरू ;१८ ते २१ एप्रिल ज्येष्ठ व दिव्यांगाचे मतदान


नोंदणी केलेले ६९९ मतदार करणार मतदान

जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांचे मतदारांना घरी जाऊन निमंत्रण

नांदेड दि.१७ :-  निवडणूक आयोगातर्फे मतदारांना मतदार माहिती चिठ्ठी अर्थात पोल चीट (Voter Information Slip ) वाटप करण्यात येते. या मतदार चिठ्ठी मध्ये मतदाराचे नाव, परिसर, केंद्र कोणते, यादी क्रमांक, भाग क्रमांक, रुम क्रमांक इत्यादी आवश्यक माहिती आहे. नांदेड मतदार संघात मतदार चिठ्ठी वाटप गतीने सुरू असून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी अशा काही

मतदारांच्या घरी पोल चीट पोहचवून मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

16 नांदेड लोकसभातंर्गत 087 नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात स्वतः जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी चिखलवाडी,वजिराबाद व गुजराती हायस्कूल परिसरात मतदारांना विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना व नवमतदारांना पोलचिटचे ( मतदान माहिती चिठ्ठी )वाटप केले. 85 वर्षे वयाच्या वरती असलेल्या नागरिकांना पूर्व कल्पना दिली.

 

यापैकी काही मतदार हे होम व्होटिंग करणार आहेत. 12 D form भरून 699 मतदारांनी घरी पोस्टल मतदान करण्याचा पर्याय स्वीकारला आहे. नांदेड दक्षिण बूथ नंबर 60 मध्ये होम वोटिंग लाभ घेत असलेल्या कस्तुरबाबाई शर्मा यांना जिल्हाधिकारी यांचे हस्ते मतदार चिठ्ठी देण्यात आली. त्यांना आश्वस्त केले, की तुमच्या घरी तुमचे मतदान नोंदवण्यासाठी टिम येणार. जेष्ठ वयोवृद्ध मतदार श्रीमती शर्मा यांनी यावेळी मतदान नोंदवणारच, असा निर्धार व्यक्त केला.

जिल्हाधिकारी यांच्याहस्ते यावेळी काही नवमतदारांनी मतदार माहिती चिठ्ठी (पोलचिट ) स्विकारली. मी मतदान करणारच असा निर्धार व्यक्त केला. जिल्हाधिकाऱ्यांनी जेष्ठांमध्ये असणारा उत्साह तरुणांनी देखील दाखवावा, असे आवाहन केले आहे. यावर्षी जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासन प्रयत्न करत असून नागरिकांनी सुदृढ लोकशाहीच्या जपवणुकीसाठी पुढे येण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विकास माने, नायब तहसीलदार नितेशकुमार बोलेलू, गुजराती हायस्कूल नांदेड बुथ क्रमांक 60 चे बि.एल.ओ. पी.डी. कोळपेवाड व महानगरपालिका प्रा शा वजीराबाद बुथ क 57 चे बि.एल.ओ. सुधाकर, नांदेड दक्षिणचे बि.एल.ओ. समन्वयक गुलाम नबी हे उपस्थित होते.


Post Views: 43


Share this article:
Previous Post: मतदान जनजागृतीच्‍या एलएईडी रथास जिल्‍हाधिकारी व मान्‍यवरांच्‍या हस्‍ते हिरवी झेंडा

April 17, 2024 - In Uncategorized

Next Post: काँग्रेसचे वसंत चव्हाण डमी उमेदवार -ऍड. अविनाश भोसीकर

April 17, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.