
नांदेडमध्ये दगडफेक | अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, पोलीस निरिक्षक साहेबराव नरवाडे यांच्यासह अनेक पोलीस अंमलदार आणि पत्रकार जखमी
नांदेड(प्रतिनिधी)-त्रिपुरामध्
त्रिपुरा राज्यात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आज देगलूर नाका परिसरात एका निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी 2 वाजेच्या सुमारास देगलूरनाका परिसरातील बरकत कॉम्प्लेक्स समोर पोलीस बरकत कॉम्प्लेक्स जवळ थम्बले होते. तेथून माळटेकडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर जमाव, बरकत कॉम्प्लेक्सकडून देगलूर नाका आणि इतवाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर जमाव अशा त्रिकोणी परिस्थितीत पोलीसमध्ये आले. निषेध सभा संपली, त्यानंतर घटनेचे निवेदन घेण्यासाठी महसुल विभागाचे अधिकारी तेथे पोहचले आणि त्यांनी निवेदन स्विकारले. त्यानंतर सर्वांना आप-आपल्या घरी जाणाचा आदेश झाला. परत जाणाऱ्या जमावामधील समाजकंटकांनी देगलूर नाका परिसरात केलेल्या दगडफेकमध्ये अनेक गाड्या फोडण्यात आल्या त्यात पोलीसांच्याही गाड्या आहेत. जमावाने कुठून तरी मोठ्या संख्येत देशी दारुच्या बाटल्या उपलब्ध केल्या आणि त्या भिरकावून पोलीसांवर हल्ला केला. या घटनेत अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, पोलीस निरिक्षक साहेबराव नरवाडे, पोलीस कर्मचारी पंकज इंगळे यांच्यासह आरसीपी पथकातील कांही पोलीस अंमलदार जखमी झाले आहेत. दगडफेकीत एका पोलीस अंमलदाराच्या पायाचे हाड मोडले आहे. या ठिकाणी वृत्तांकनासाठी गेलेल्या पत्रकार हैदर अली यांनाही दगडफेकीत मार लागला आहे. रस्त्यावर दारुच्या बाटल्यांचे काच विखुरले आहेत. हैद्राबादकडे जाणारी या भागातील वाहतुक विस्कळीत झाली आहे.
देगलूर नाका येथे घडलेल्या परिस्थितीची माहिती गावभर वाऱ्यासारखी पसरली त्यानंतर शिवाजीनगर, कलामंदिर, पावडेवाडी नाका आदी ठिकाणी सुध्दा समाजकंटकांनी दगडफेक केली. या दगडफेकीत कांही जणांना किरकोळ मार लागला आहे. एक मिठाईचे दुकान आणि गुरूकृपा ट्रेडर्स असा दोन दुकानांची नासधुस करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्यासह असंख्य पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार घटनास्थळी पोहचले. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. या संदर्भाचे गुन्हे दाखल होण्याची प्रक्रिया वृत्तलिहिपर्यंत पुर्ण झाली नव्हती.