नांदेडमध्ये गुरुवारी कुठे असणार लस उपलब्ध

नांदेड : वय 45 वर्षांवरील नागरिकांसाठी लसीचा दुसरा डोस जिल्ह्यातील प्रत्येक केंद्रांना त्या-त्या ठिकाणच्या परिस्थितीनुरुप वितरण करण्यात आले असून नागरिकांनी डोसच्या उपलब्धतेप्रमाणे लसीकरण केंद्रांवर पोहचावे, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

गुरुवारी (20 मे) केंद्रनिहाय डोसेसची मात्रा उपलब्ध करुन दिली आहे. यात कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींचा समावेश आहे. मनपा क्षेत्रात मोडणाऱ्या श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, कौठा, सिडको या 8 केंद्रावर कोविशिल्डचे 100 डोस प्रत्येकी देण्यात आले.

श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, कौठा, सिडको, दशमेश हॉस्पिटल, रेल्वे हॉस्पिटल या 11 केंद्रावर कोव्हॅक्सिनचे 100 डोस उपलब्ध करुन देण्यात आले.उपजिल्हा रुग्णालय देगलूर, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, माहूर, उमरी, नायगाव येथे कोविशिल्डचे प्रत्येकी 100 डोस, उपजिल्हा रुग्णालय हदगाव, ग्रामीण रुग्णालय लोहा, मुदखेड, बारड येथे कोविशिल्डचे 80 डोस, ग्रामीण रुग्णालय हिमायतनगर येथे कोव्हॅक्सिनचे 50 डोस, ग्रामीण रुग्णालय मांडवी येथे कॉव्हॅक्सिनचे 70 डोस तर सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र (एकुण 67) येथे कोविशिल्डचे प्रत्येकी 100 डोस याप्रमाणात लसीची उपलब्धता करुन दिली आहे.

जिल्ह्यात 18 मे पर्यंत एकुण 4 लाख 4 हजार 665 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. जिल्हयात 19 मे पर्यंत कोविशिल्डचे 3 लाख 34 हजार 930 व कोव्हॅक्सिनचे 1 लाख 5 हजार 340 डोस असे एकुण 4 लाख 40 हजार 270 डोस मिळाले आहेत.

कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्याच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस घेणे वैज्ञानिकांनी अधिक हितावह असल्याचे स्पष्ट केले आहे. 18 ते 44 वयोगटातील लाभार्थीचे लसीकरण तुर्तास थांबविण्यात आले आहे. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eighteen + nine =

vip porn full hard cum old indain sex hot