August 9, 2022

नांदेडमध्ये कोरोनाचा कहर, त्यात उन्हाच भर, नागरिक त्रस्त 

Read Time:3 Minute, 22 Second

आज 1207 पॉझिटिव्ह व 26 मयत

जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असतानाच दुसरीकडे उन्हाचा पारा सुद्धा चाळीशीकडे आगेकूच करत असल्याने आगामी दिवसात नागरिकांना उन्हाच्या तीव्रतेचा अधिक सामना करावा लागू शकतो, अशी शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 

राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे झाले आहे. त्यासोबतच उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रवाह सुद्धा थांबला आहे. परिणामी हिवाळा संपला असून उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत असल्याचे दिसून येत आहे. नांदेडचे कमाल तापमान चाळीशीवर जात आहे. दिवसासह रात्री सुद्धा नागरिकांना उकाड्याचा अनुभव येत आहे. त्यामुळे काही घरांमध्ये कुलर सुरू झाले असून दिवसा गर्मीपासून सुटका व्हावी, यासाठी नागरिक घरात पंख्याचा व घराबाहेर सावलीचा आसरा घेत आहेत. नेहमीप्रमाणेच यावर्षी सुद्धा उन्हाची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांना उन्हाळा घाम फोडणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.  

[woo_product_slider id=”480″]
उष्मांक वाढता राहील 
जिल्ह्यात उन्हाळ्याची चाहूल लागल्याने आगामी दिवस नागरिकांसाठी तापदायक ठरतील. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच तापमान चाळीशीच्या वर असल्याने यावर्षी उन्हाळ्याचे आगमन लवकरच झाल्याचेही दिसून येत आहे. रात्रीच्या तापमानाची सुद्धा १८ अंश सेल्सियसपर्यंत नोंद होत असल्याने रात्री नागरिकांना गर्मीचा त्रास सहन करावा लागत आहे. 

कोरोना बाधित रुग्णांसोबत मृत्यूसंख्याही वाढली
दुसऱ्या टप्प्यामध्ये नांदेड जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांसोबतच मृत्यूसंख्याही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे नांदेडकरांमध्ये मोठी धास्ती बसली असून, अनेकांनी घरीच राहणे पसंद केलेले आहे. एक एप्रिल रोजी 995 बाधित रुग्ण तर 26 मृत्यू आणि शुक्रवारी (ता.दोन एप्रिल) एक हजार 246 बाधित आणि 23 मृत्यू झाले आहेत. परिणामी वाढत्या उन्हासोबतच नांदेडकरांनी आता कोरोनाचेही चटके सहन करावे लागत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

twenty + 4 =

Close