नांदेडच्या मुंबई पुण्यातील विद्यार्थ्यांना व नागरिकांना जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन ;शुक्रवारला जिल्हयात मतदानाला या !


नांदेड :- नांदेड शहरातील व जिल्ह्यातील जे नागरिक विद्यार्थी मुंबई पुण्याला किंवा अन्य शहरात आहे त्यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये 26 एप्रिलला मतदानासाठी यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

नांदेड जिल्ह्यामध्ये 26 एप्रिलला मतदान होत आहे. मोठ्या संख्येने अनेक नागरिक नोकरी व्यवसायानिमित्त अन्य शहरात स्थायिक झाले आहेत.त्यांचे नाव जिल्ह्याच्या मतदार यादीत आहे. अनेक विद्यार्थी, तरूण मतदार मुंबई पुण्यामध्ये शिकण्यासाठी आहे. या मुलांनी राष्ट्रीय कर्तव्य निभावत 26 एप्रिलला नांदेड येथे मतदानासाठी आपापल्या केंद्रावर पोहोचावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

विद्यार्थ्यांसाठी पोस्टल बॅलेट किंवा अन्य कोणतीही सुविधा आयोगामार्फत नाही. त्यामुळे आपल्या पितृक गावाकडे नियमित ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी यावेळी गावाकडे येण्याचे नियोजन 26 एप्रिलला करावे. दरवेळी गावाकडे येण्याचे नियोजन सण, उत्सवाला करतो . यावेळी राष्ट्रीय कर्तव्य म्हणून हे राष्ट्रीय उत्सवाला नियोजन करावे.शुक्रवारला मतदान करून शनिवार, रविवार कुटुंबात राहता येईल, त्यामुळे विद्यार्थ्यांनी 26 एप्रिल तारीख चुकवू नये, असेही आवाहन त्यांनी केले आहे.

*पोलचीट मिळवा* 

नांदेड जिल्ह्यातील कोणत्याही मतदारसंघातील Poll Chit मिळाली नसल्यास कृपया खालील क्रमाकावर +91 75885 69875 या नंबरवर Pchit असा व्हाटसॲप मेसेज करावा, आपल्याला मतदानाबाबतची माहिती मिळेल याचाही उपयोग बाहेरगावातील विद्यार्थी व नागरिकांनी करावा, असेही आवाहन त्यांनी केले आहे.


Post Views: 97


Share this article:
Previous Post: प्रचार संपला ; २६ एप्रिलला सकाळी ७ पासून मतदान ;४८ तासांच्या शांतता कालावधीला सुरुवात

April 24, 2024 - In Uncategorized

Next Post: मतदानानंतर रडण्यापेक्षा मतदान करण्याअगोदरच पुर्ण विचार करून मतदान करा

April 25, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.