August 9, 2022

नांदेडचे भूमिपुत्र यशदातील अधिकारी डॉ. बबन जोगदंड डॉ. आंबेडकर चरित्र प्रकाशन साधने समितीवर

Read Time:2 Minute, 53 Second

यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, यशदा या महाराष्ट्र शासनाच्या शिखर प्रशिक्षण संस्थेतील माध्यम व प्रकाशन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. बबन जोगदंड यांची राज्यशासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन या समितीवर सदस्य म्हणून निवड केली आहे. डाॅ. बबन जोगदंड हे नांदेड जिल्ह्याचे भूमिपुत्र असून त्यांच्यावर त्यांच्या चाहत्यांकडून कौतुकाची थाप पडत आहे.

राज्य शासनाने मंगळवारी (ता. ३०) एक अध्यादेश काढून या समितीचे तीन वर्षासाठी पुनर्गठन केले आहे. या समितीच्या सदस्य सचिवपदी डॉ.कृष्णा कांबळे यांची निवड केली आहे. समितीतील अन्य सदस्यांमध्ये ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, पत्रकार निखिल वागळे यांच्यासह अन्य सदस्यांचा समावेश आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या संघटनेचे पुनर्गठन करण्याची मागणी शासनाकडे होत होती. आज शासनाने त्यासंबंधातील शासन अध्यादेश काढून या समितीचे पुनर्घटन केले. या समितीचे अध्यक्ष राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आहेत.

डॉ. बबन जोगदंड यांचा प्रकाशन व साहित्य क्षेत्रातील मोठा अनुभव असून त्यांनी पत्रकारितेमध्ये पीएचडी ही पदवी संपादन केली आहे. त्याचबरोबर यशदाच्या माध्यम व प्रकाशन केंद्रामार्फत अनेक ग्रंथांचे संपादन केले आहे. त्यांची स्वतः ची सात पुस्तके प्रकाशित असून त्यांनी आतापर्यंत तेरा विषयात पदव्या व आठ विषयांमध्ये डिप्लोमा, कोर्सेस केले आहेत, त्यापैकी सहा विषयात त्यांनी एम. ए. केले आहे. त्यांनी यापूर्वी दहा वर्षे पत्रकारितेत काम केले असून त्यांना प्रकाशन क्षेत्रातील दांडगा अनुभव आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षण व आर्थिक विचारावर त्यांचे दोन ग्रंथ प्रकाशित आहेत. त्यांच्या निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

five × two =

Close