August 9, 2022

जिल्हा पोलिस दलातील एका हवालदाराचा कोरोनामुळे मृत्यू | नांदेडकरांनो सावधान…

Read Time:2 Minute, 45 Second

जिल्हा पोलिस दलात कार्यरत असलेला पोलिस हवालदार भावराव राऊत (वय ५७) बक्कल नंबर १७३८ यांचा शनिवारी (ता. २७) सकाळी कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर दुपारी बारा वाजता गोवर्धन घाट येथे अंतिम संस्कार करण्यात आले. श्री. राऊत हे पोलिस मुख्यालयात कार्यरत होते.

ता. १३ मार्च रोजी त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. सुरुवातीला त्यांनी शासकीय रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर प्रकृती बिघडत चालल्याने ता. २१ मार्च रोजी त्यांनी शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेण्यास सुरुवात केली. परंतु कोरोनाविषाणूने त्यांच्यावर काळाचा घाला घआतला आणि सकाळी (ता. २७) मार्चच्या सात वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. भाऊराव शामराव राऊत हे सन १९९३ मध्ये नांदेड जिल्हा पोलिस दलात भरती झाले होते. ते मूळचे वडेपुरी तालुका लोहा येथील रहिवासी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार असून ते सध्या नांदेडच्या स्नेहनगर पोलिस वसाहतीत वास्तव्यास होते. शनिवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास गोवर्धन घाट येथे अंतिम संस्कार करण्यात आले.

भाऊराव शामराव राऊत हे येत्या जूनमध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणार होते. परंतु कोरोनाने त्यांची सेवा पूर्ण करु दिली नाही. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत पोलिस दलाला आपला एक जवान गमवावा लागला. यापूर्वी सन २०२० मध्ये कोरनाच्या पहिल्या लाटेत जिल्हा पोलिस दलातील मुख्यालयीन कर्मचारी बालाजी ढगे, मुक्रमाबाद येथील बालाजी आलुरे आणि मांडवी येथील सोमनाथ मठपती या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. भाऊराव राऊत यांच्या मृत्यूमुळे पोलिस दलात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

16 + 16 =

Close