January 22, 2022

नांदेडकरांना दिलासा केवळ १५४ नवे रुग्ण

Read Time:3 Minute, 37 Second

नांदेड: जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या १ हजार ६४१ अहवालापैकी १५४अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे १२३ तर अँटिजेन तपासणीद्वारे ३१ अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या ८७ हजार १०३ एवढी झाली असून यातील ८१ हजार ९१८ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला २ हजार ९९१ रुग्ण उपचार घेत असून १२३ बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे.

दिनांक १६ व १७ मे २०२१ या दोन दिवसांच्या कालावधीत १२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या १ हजार ८१६ एवढी झाली आहे. दिनांक १६ मे २०२१ रोजी शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे शिवशंकरनगर किनवट येथील ८० वषार्चा पुरुष, मुदखेड येथील ४५ वषार्चा पुरुष, जिल्हा रुग्णालय कोविड नांदेड येथे लोहा येथील ६० वषार्ची महिला, हदगाव तालुक्यातील आष्टी येथील ५८ वषार्चा पुरुष, मुदखेड तालुक्यातील जवळा येथील ६० वषार्ची महिला, आश्विनी कोविड रुग्णालयात शारदानगर नांदेड येथील ७० वषार्चा पुरुष, यशोसाई कोविड रुग्णालयात फत्तेपूर नांदेड येथील ३५ वषार्चा पुरुष, लोटस कोविड रुग्णालयात नायगाव तालुक्यातील नरसी येथील ३५ वषार्चा पुरुष, व्हिजन कोविड रुग्णालयात भोकर येथील ५८ वषार्ची महिला, डेल्टा कोविड रुग्णालयात देगलूर तालुक्यातील टाकळी येथील ६६ वषार्चा पुरुष तर १७ मे रोजी भगवती कोविड रुग्णालयात पुरुषार्थनगर नांदेड येथील ७० वषार्ची महिला, नायगाव तालुक्यातील राहेर येथील ६५ वर्षाच्या पुरुष यांचा समावेश आहे.

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा ६१, देगलूर ६, किनवट ५, मुखेड ४, लातूर १, नांदेड ग्रामीण १५, हदगाव ४, लोहा २, नायगाव २, परभणी २, अधार्पूर ४, हिमायतनगर 2, माहूर 4, यवतमाळ १, बिलोली 2, कंधार 3, मुदखेड १, हिंगोली २, औरंगाबाद १ बाधित आढळले तर अ‍ॅन्टिजेन तपासणीमध्ये नांदेड मनपा क्षेत्रात ३, कंधर १, मुदखेड १, लातूर १, भोकर १, किनवट २, मुखेड ३, हिंगोली १, देगलूर ६, लोहा १, नायगाव १, हदगाव २, माहूर ६, यवतमाळ ४ असे एकूण १५४बाधित आढळले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

twenty + nineteen =

Close