नव वर्षाच्या पार्टीत मित्राचा खुन

Read Time:3 Minute, 20 Second

 

नांदेड: किरकोळ वादातून एका कारचालक मित्राचा चोैघांनी खून करून मृतदेह चौथ्या माळयावरून खाली फेकून दिला.ही भयंकर घटना नांदेड शहरातील मालेगाव रोडवरील सिद्धिविनायक नगर भागात नववर्षाच्या पार्टीत रात्रीस घडली. या प्रकरणी मयताच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून भाग्यनगर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यबाबत माहिती अशी की,मयत कारचालक संतोष वामनराव भालेराव वय ३० वर्षे रा.गोदावरी नगर मालेगाव रोड हा दि.३१ डिसेंबर रोजी सकाळी आरोपी सोपान बालाजी नेवाल पाटील, गणेश व्यंकटराव कदम, माधव ज्ञानोबा बोलके व मारोती लव्हाजी बोलपेवाड यांना भाड्याच्या कारने धमार्बादला नेले होते. त्यानंतर संतोष त्यांना घेऊन परत नांदेडला आला. आरोपी सोपान पाटील यांना त्यांच्या घरी सोडल्यानंतर संतोषला त्यांनी घरी थांबवून घेतले, त्यानंतर पती घरी न आल्याने संतोषला त्याच्या पत्नीने फोन केला असता थोड्या वेळात येईल असे सांगितले. मात्र बराच वेळ होऊनही संतोष घरी पोहचला नाही. दरम्यान रात्री दहाच्या सुमारास आपल्या पत्नीला त्याने फोन केला असता संतोषला कोणीतरी मारहाण करीत असल्याचा आवाज फोनवर येत होता, असे त्यांनी फोनमध्ये आरोपी सोपान पाटील, गणेश कदम, माधव बोलके, मारोती बोलपेलवाड यांची नावे घेतले असेही संतोषच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

या चोैघानी संतोष याचा खून करून त्याला सिद्धिविनायक नगर येथील घराच्या चोैथ्या माळ्यावरून खाली फेकून दिले. मयताची पत्नी श्वेता पती घरी आला नसल्याने आरोपी सोपान पाटील याच्या सिद्धिविनायक नगर येथील घरी गेली असता तिचा पती मयत अवस्थेत दिसून आला.दरम्यान सर्वत्र नवीन वर्षाच्या स्वागत मोठ्या जल्लोषात होत असताना किरकोळ कारणावरून झालेल्या वादात एका निष्पाप तरूणाला जीवानिशी मुकावे लागले. या प्रकरणी मयताची पत्नी श्वेता संतोष भालेराव रा. गोदावरी नगर मालेगाव रोड यांच्या फिर्यादीवरून भाग्यनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील चारहीजणांना गुन्हा दाखल होताच पोलिसांनी अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

five × five =