January 22, 2022

नव्वदी पार चव्हाण दांपत्याची कोरोनावर मात; घरीच राहून कोरोनावर मिळविला विजय

Read Time:5 Minute, 53 Second

पोहरेगाव : मनात प्रबळ इच्छाशक्ती,जगण्याची जिद्ध व डॉक्टर,नातेवाईक यांच्या दिलेल्या आधारावरच कोरोनाच्या आजाराला न घाबरता परिस्थितीला तोंड देत तब्बल 16 दिवस एकाच जागेवर पडून कोरोनाला हरवून मात केल्याची घटना पोहरेगाव तांडा येथे घडली आहे.

सविस्तर असे की,रेणापूर तालुक्यातील मौजे पोहेरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणारे पोहरेगाव तांडा येथील चव्हाण दाम्पत्य कुटुंबीय होय.

एकीकडे संपूर्ण भारतामध्ये कोरोणाचा आकडा दिवसागणिक वाढत असल्याने अशा भयावह परिस्थिती समोर अनेकांनी आपले हात टेकले आहेत.परंतु अशा भयानक परिस्थितीमध्ये ही आपले कुटुंब,डॉक्टर व नातेवाईक यांच्या आधारावरच दवाखान्यामध्ये भरती न होता, घरच्या घरीच होम विलगीकरण कक्षात उपचार घेऊन कोरोना यां आजारावर वयाच्या 90 वर्षीय चव्हाण दांपत्य यांनी खचून न जाता कोरोना संसर्गजन्य आजारावर यशस्वी पणे मात केली आहे.चव्हाण दांपत्य यांनी कोरोना विरुद्ध तब्बल 18 दिवस दिलेला लढा हा सर्वांना प्रेरणादायी ठरला आहे.

तालुक्यातील कोरेगाव तांडा येथील सिद्राम जेमला चव्‍हाण (वय 90 वर्ष) व पत्नी भुराबाई सिद्राम चव्हाण (वय 87 वर्ष) यांना दिनांक 7 एप्रिल रोजी दोंघाची तबियत अचानक खराब झाली.ताप,शिवाय अंगदुखी व डोकेदुखी होत आहे म्हणून हीं लक्षणे कोरोनाची असल्याने जवळील पोहरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी यांनी टेस्ट करून घेतली.त्यावेळी दोन्हीना कोरोणाची लागण झाल्याचे रॅपिड टेस्ट मध्ये निष्पन्न झाले.त्यात सिद्राम चव्हाण यांना शुगर व दम्यांचा आजार होता.त्यामुळे कोरोनाचा अभ्यास नसल्यामुळे घरातील सगळेच घाबरले गेले.शिवाय पोहरेगाव व तांड्यावर कोरोनाचे रुग्ण 100 पार गेले होते.

सर्व पॉझिटिव रुग्णांना बावची येथील कुबीर सेंटर मध्ये हलविण्यात येत होते. त्यामुळे परिसरात त्याबाबत भीतीचे वातावरण पसरले होते.त्यामुळे आपणांस आता यां वयात हा आजार झाल्याने आता शेवटची वेळ म्हणून पाहुणे मंडळी व सुना,नातवंडे,मुले रडू लागले.परंतु कोरोनाने रुग्ण दगावत नाहीत त्यावर योग्य प्रकारे औषधी उपचार केल्यास रुग्ण बरा होतो यां आशेनं एक आशादायी वातावरण जावई पत्रकार शरद राठोड यांनी तयार केले. एकीकडे कोरोना म्हणले की,ऑक्सिजन,व्हेंटिलेटर मिळत नाही शिवाय लाखावर बिले तरीही रुग्ण मागारी न येता यमलो की जातो अशी काहीशी धारणा चव्हाण कुटुंबीयांची झाली होती. त्यानंतर होम विलगीकरण मध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते.दिवसेंदिवस चव्हाण दांपत्याची तबियत ढासळू लागल्याने,भ्रमणध्वनीवर पाहुणे नातेवाईक रडू लागले.

परंतु प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैधकीय अधिकारी डॉ.एम.एन.कुलकर्णी व डॉ.बिभिषण जाधव यांनी वेळेवर कर्मचारी यांच्याकडून गोळ्या-औषधी देऊन धीर देत उपचार सुरू होते.त्यामुळे चव्हाण दांपत्य यांनी धीर सोडला नसल्याने अखेर त्यांची झुंज यशस्वी ठरली.म्हणून केवळ इछाशक्तीच्या जोरावर व परिवारांच्या शब्दपोटी दिलेल्या ऑक्सिजनवर कोरोनाला हरवून यां जोडीने नवतरुण व आजच्या पिढीला प्रेरणादायी लढा दिल्याने सर्व स्तरांतून त्यांच्यावर कोतुकांचा वर्षाव होत आहे.

सुरुवातीला कमी-अधिक ताप पुन्हा डोखेदुखी व अंगदुखी यामुळे आम्ही एकाच जागेवर पडुन राहीलो.आम्हांला कोविंड सेंटर येथे नकोय,शेतातच जागा दया असं आग्रह करीत होतो.यांमध्ये माझी मंडळी यांनी खच खाल्ली पण डाक्टर,जावई,नातेवाईक यांनी दिलेला धीर यामुळे आम्ही सेवालाल,सामकी माता कृपेने कोरोनाला हरवूणं आजारमुक्त झालो.त्यामुळे डॉक्टर,कर्मचारी, सिस्टर यांचे मनापासून आभार मानतो असे सिद्राम चव्हाण यांनी बोलताना सांगितले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

4 × five =

Close