नववर्षात रेल्वे प्रवास महागणार!

Read Time:3 Minute, 3 Second

नवी दिल्­ली : नव्या वर्षात रेल्वे प्रवाशांच्या खिशावरील ओझे वाढणार आहे. रेल्वेने प्रवास करण्यासाठी कमीतकमी १० ते ५० रुपयांपर्यंत अतिरिक्त झळ सोसावी लागणार आहे. रेल्वे मंत्रालयाने एअरपोर्टच्या धर्तीवर विकसित केलेल्या रेल्वे स्­टेशन्सवर स्­टेशन विकास शुल्क घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना हे शुल्क यूजर चार्जच्या स्वरुपात द्यावे लागणार आहे. हा चार्ज कमीतकमी १० ते जास्तीत जास्त ५० रुपयांपर्यंत असणार आहे.

एअरपोर्टच्या धर्तीवर तयार होत असलेल्या नव्या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांकडून युजर चार्ज घेतले जाईल. हा चार्ज १० ते ५० रुपयांपर्यंत असेल. रेल्वे देशभरात ४०० रेल्वे स्थानके जागतिक दर्जाच्या सुविधांसह तयार करत आहे. यातील बहुतांश रेल्वे स्थानकांचे काम सरकारी-खासगी भागीदारीने सुरू आहे. गांधी नगर आणि भोपाळचे राणी कमलावती रेल्वे स्थानक सज्ज झाले असून पंतप्रधान मोदींनी त्याचे उद्घाटनही केले आहे.

रेल्वे बोर्डाचीही मंजुरी
रेल्वे बोर्डाने प्रवाशांना युजर चार्जेस लावण्यास मान्यता दिली आहे. वेगवेगळ्या क्लासच्या प्रवाशांना वेगवेगळा चार्र्ज लावला जाईल आणि त्याचा समावेश तिकिटातच असेल.

विमानतळांप्रमाणे रेल्वे स्थानकांवरही यूजर चार्ज
अनारक्षित तिकिटांवर प्रवास करणा-यांसाठी हे शुल्क १० रुपये असेल आणि स्लीपरने प्रवास करणा-यांना २५ रुपये तर एसीमध्ये प्रवास करणा-यांना ५० रुपये अतिरिक्त यूजर चार्ज आकारले जाईल. सध्या अशा प्रकारचे शुल्क केवळ देशातील विमानतळांवरच आकारले जाते. मात्र, रेल्वे मंत्रालयातील अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, हे शुल्क केव्हापासून आकारले जाईल यासंदर्भात अद्याप निर्णय झालेला नाही.

प्लॅटफॉर्म तिकीट खरेदी करणा-यांनाही सेवा शुल्काच्या स्वरुपात १० रुपये द्यावे लागतील. विमानतळाप्रमाणे विकसित करण्यात आलेल्या स्थानकावर उतरणा-या प्रवाशांनाही निश्चित किंमतीच्या ५० टक्के शुल्क आकारले जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published.

18 + fifteen =