January 21, 2022

नववर्षदिनी भाजप-राष्ट्रवादीत राडा

Read Time:4 Minute, 54 Second

सोलापूर-पंढरपुरात भाजप जिल्हाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची झाली आहे. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा घोषणाबाजीने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांत जोरदार वाद झाला आहे. पंढरपुरात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्ये यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा घोषणाबाजीने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी मंदिर परिसरात बराच काळ बघ्यांची गर्दी सुद्धा झाली होती.भाजप अध्यात्मिक आघाडी प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले हे पंढरपुरात मंदिरात दर्शनाला आले. यावेळी तुषार भोसले यांच्या अंगावर काळे टाकण्यासाठी राष्ट्रवादी काँगर्सेचे कार्यकर्ते आले होते. त्यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी त्यांना रोखले आणि मग भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत जोरदार बाचाबाची झाली.

आचार्य तुषार भोसले यांनी नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. या नंतर संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आचार्य तुषार भोसले यांचा विरोध करत त्यांच्या अंगावर काळे टाकण्याचा प्रयत्न केला.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युवक प्रदेश सचिव आणि भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना रोखले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या गळ्यातील पंचा काढून भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी कार्यकर्त्यांना हिसकावून दिले. मंदिर परिसरात बराच वेळ बघ्यांची गर्दी झाली होती. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने तसेच कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीमुळे मंदिर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे संदीप मांडवे यांनी सांगितलं, नववर्षानिमित्त श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी आम्ही येथे आलो होतो. यावेळी भाजपचे तुषार भोसले हे आले होते. त्यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी माहिती नसताना शरद पवारांवर टिप्पण्णी केली होती. यामुळे आम्ही तुषार भोसले यांना शरद पवारांचे ‘लोक माझे सांगाती’ हे पुस्तक भेट देण्यासाठी आम्ही गेलो होतो. तेथे भाजपचे 15-20 पदाधिकारी होते. त्यांनी आगाऊपणा करत घोषणाबाजी सुरू केली.

आमच्या पदाधिका-यांना त्यांनी धक्काबुक्की केली. आम्हाला आंदोलन करायचं असतं तर आम्ही आणखी कार्यकर्ते घेऊन गेलो असतो पण आम्ही दर्शनासाठी गेलो होतो आणि गाडीत असलेले पुस्तक आम्ही देत होतो.भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी म्हटलं, आचार्य तुषार भोसले यांनी राज्यभर मंदिरे उघडण्यासाठी तीव्र आंदोलने केली. या आंदोलना दरम्यान सर्व भाविक भाजपच्या मागे आले. राष्ट्रवादीच्या शहराच्या अध्यक्षांनी देशाच्या पंतप्रधानांवर टीका केली. तरी आम्ही मोठ्या मनाने याकडे दुर्लक्ष केलं. जर कुणी वाईट करत असेल तर जशास तसे उत्तर देणं हे भाजप पदाधिकारी म्हणून आमचं काम आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two × four =

Close