“नरेंद्र मोदींना भेटल्यावर महापुरुषाला भेटल्यासारखं वाटतं”

Read Time:1 Minute, 51 Second

पुणे | भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यासंबधीत त्यांनी एका कार्यक्रमात मोदींचं कौतुक केलं आहे. यावेळी अध्यक्षपद दिल्याने त्यांनी पक्षाचं आणि पाठिंब्याबद्दल कार्यकर्त्यांचे आभार मानलेत. पुण्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

मी नरेंद्र मोदी(Narendra modi) यांना भेटण्यासाठी सहपरिवार गेलो होतो. मोदींनी माझ्याशी आपुलकीने संवाद साधला. 22 मिनिटं आमचा संवाद सुरु होता. ही माझ्यासाठी आयुष्यभराची पुंजी आहे. त्यांना भेटल्यावर मला एका महापुरूषाला भेटल्यासारखं वाटलं, असं वक्तव्य त्यांनी कार्यक्रमात केलं आहे.

माझ्यावर विश्वास टाकून मला जबाबदारी देण्यात आली आहे. ड्रायव्हरने चूक केली तर अपघात होतो, पायलटने चूक केली तर विमानाचा अपघात (accident) आहे. त्याचप्रमाणे पक्षाची जबाबदारी माझ्यावर आहे. ती मी योग्यारित्या पार पाडेन, असं बावनकुळे म्हणालेत.

पंतप्रधानांनी देशातील 70 कोटी तरुणांना उभ करण्याचं स्वप्न पाहिलं आहे. आपण नरेंद्र मोदी आणि एपीजे अब्दुल कलाम(APJ Abdul Kalam) यांचं स्वप्न पुर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असंही ते कार्यक्रमात म्हणालेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

one × 5 =