नगरपंचायतच्या ११ जागांचे आरक्षण जाहीर

Read Time:4 Minute, 57 Second

नांदेड:प्रतिनिधी

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानूसार नगर पंचायतमधील ओबीसींच्या जागा खुल्या प्रवगासाठी ठेवण्यात आल्या आहेत.यानूसार गुरूवारीं नांदेड जिल्हयातील तीन नगरपंचायतच्या ११ जागांसाठी आरक्षण सोडत झाली.यात अर्धापूर येथील चार पैकी दोन महिला व दोन पुरूष,माहूरच्या चार पैकी दोन महिला व दोन पुरूष तर नायगाव येथील तीन पैकी तीन पैकी दोन पुरूष व महिलेसाठी एक जागा सुटली आहे.

अधार्पुर: नगरपंचायतीच्या चार प्रभागातील आरक्षण दि. २३ डिसेंबर रोजी सकाळी अधार्पूर तहसील कार्यालयात आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यात प्रभाग सर्वसाधारण महिलासाठी राखीव ठेवण्यात आले असून उर्वरित दोन प्रभाग सर्वसाधारण खुल्या प्रवगार्साठी जाहीर झाले आहेत.
एकूण १७ सदस्य संख्या असलेल्या अधार्पूर नगरपंचायत निवडणुकीत एकूण १७ प्रभागाचे आरक्षणाची सोडत जाहीर झाली होती. या सोडतीत ११ जागेवर सर्व साधारण, ४ जागेवर ओबीसी राखीव आणि २ जागा अनुसूचित जाती राखीव प्रवगार्साठी जाहीर करण्यात आल्या होत्या. परंतु ऐनवेळी ओबीसी. आरक्षण रद्द झाल्यामुळे ओबीसी आरक्षित प्रभाग वगळून उर्वरित १३ जागेसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. आणि येथील ४ आरक्षित जागेवरील निवडणुक रद्द करण्यात आली. ही रद्द झालेली निवडणूक दि. १८ जानेवारी २०२२ रोजी होणार असून या चारही जागा सर्वसाधारण खुल्या प्रवगार्साठी ठेवण्यात आल्या आहेत. या चार जागेवर नव्याने महिला आरक्षण सोडत दि. २३ डिसेंबर रोजी अधार्पूर तहसील कार्यालयात पार पडली.

या आरक्षण सोडतीत दोन प्रभाग सर्वसाधारण महिलासाठी राखीव ठेवण्यात आले असून उर्वरित दोन प्रभाग सर्वसाधारण खुल्या प्रवगार्साठी ठेवण्यात आले आहेत. यातील प्रभाग क्रमांक १ आणि ९ हे दोन प्रभाग सर्वसाधारण महिला राखीव असून प्रभाग क्रमांक ७ आणि १६ हे दोन प्रभाग सर्वसाधारण खुल्या प्रवगार्साठी जाहीर झाले आहेत. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी विकास माने, तहसीलदार उज्वला पांगारकर, मुख्याधिकारी शैलेश फडसे, नायब तहसिलदार मारोतराव जगताप व कर्मचारी उपस्थित होते.

माहूर: येथील नगरपंचायतच्या चार जागा पैेकी प्रभाग क्रमांक १ सर्वसाधारण पुरुष,प्रभाग क्रमांक ३ सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक ६ सर्वसाधारण महिला व प्रभाग क्रमांक ९ हा सर्वसाधारण पुरुषासाठी आरक्षित झाला आहे.

नायगाव: नगरपंचायतच्या तीन जागा पैेकी प्रभाग क्रमांक ७,११ आणि १७ या प्रभागासाठी सोडत झाली.यात सर्वसाधारण प्रवर्गात दोन पुरूष व महिलेसाठी एक जागा सुटली आहे.ओबीसीचे आरक्षण रद्द झाल्यामुळे स्थानिक स्वराज संस्थासाठी होणा-या निवडणूकीत या जागा आता खुल्या वर्गातून भरल्या जात आहेत.यासाठी गुरूवारी हे नवे आरक्षण जाहीर झाले आहे.
दरम्यान राज्यात होवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने ओबीसी आरक्षणासाठी राजय शासनाने अध्यादेश काढला होता. मात्र तो अद्यादेशही सर्वोच्च न्यायालयाने रदद ठरविला. यानंतर नगर पंचायत निवडणुकीतील ओबीसी आरक्षण रद्द झाले.नांदेड जिल्हयातील तीन नगरपंचायतमधील ११ ओबीसींच्या जागांना फटका बसला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

9 − 7 =