‘नंगटपणा करणाऱ्या या बाईला बेड्या ठोका’, चित्रा वाघ उर्फीवर भडकल्या

मुंबई| कपड्यांच्या विचित्र फॅशनमुळं उर्फी जावेद(Urfi Javed) नेहमीच चर्चेत येत असते. उर्फीला बऱ्याचदा ट्रोलही केलं गेलं आहे. परंतु तरीही उर्फी कोणाचाही विचार न करता कपड्यांची फॅशन करण्यात मग्न असते.
आता या सगळ्यात भाजप(BJP) नेत्या चित्रा वाघ(Chitra Wagh) यांनीही उर्फीला टार्गेट केलं आहे. त्यामुळं उर्फी आणि चित्रा वाघ आमने-सामने आल्या आहेत. सध्या या दोघींच्या वादावर सोशल मीडियावर विविध चर्चांणा उधाण आलं आहे.
चित्रा वाघ यांनी उर्फीवर एक ट्विट केलं आहे. चित्रा वाघ यांनी उर्फीचा एक व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे की, शी, हे चाललंय काय, रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी उत्तानपणे नंगटपणा करणारी ही बाई, हिला रोखायला मुंबई पोसिल आहेत की नाही.
तात्काळ बेड्या ठोका हीला. एकीकडे निष्माप महिला विकृतांच्या शिकार होत आहेत. त्यात ही बया अजून विकृती पसरवत आहे.असंही चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे.
दरम्यान, चित्रा वाघ यांच्या ट्विटला उर्फी जावेदनं कडक शब्दांत प्रत्तुतर दिलं आहे. या वादावर काही नेटकरी उर्फीची बाजू घेत आहेत तर काहीजण मात्र तिला विरोध दर्शवित आहेत.
महत्वाच्या बातम्या-