
ध्येय निश्चित असेल तर फक्त जिद्दीने अभ्यास सुरू करा यश मिळणारच : प्रा बानूगडे पाटील
ध्येय निश्चित असेल तर फक्त जिद्दीने अभ्यास सुरू करा यश मिळणारच : प्रा बानूगडे पाटील
महाब्रँड आयआयबी तर्फे आयोजित “इंस्पायर” कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या अतिप्रचंड प्रतिसादाने संपन्न
येथील चांदोजी पावडे मंगलकार्यालयात सुप्रसिद्ध प्रबोधनकार, इतिहास अभ्यासक, लेखक, प्रेरणादायी वक्ते प्रा. नितीन बानुगडे पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना जिद्द,प्रेरणा व निरंतर कष्ट या त्रिसूत्री आधारलेल्या अनेक उदाहरणांसह विविधांगी मार्गदर्शन केले यावेळी विद्यार्थी,पालकांसह आयआयबीच्या संपूर्ण टिमची उपस्थिती होती..
ज अमोघ वर्क्तत्वासाठी सुप्रसिद्ध असलेल्या प्रा.बानगुडे यांनी विद्यार्थ्यांना आपले ध्येय निश्चित करून त्यासाठी कठोर आणि सातत्यपूर्ण कष्ट करण्याची ठेवा जितके कष्ट जास्त यश तितकेच मोठे असते तसेच आपण जिंकणार म्हणजे जिंकणारच अशी पक्की खूण मनाशी बांधा मग बघा यश हे तुमचेचं असेल असे ते म्हणाले पुढे बोलतांना ते म्हणाले की, कुठलेही काम लहान नाही म्हणून समोर आलेल प्रत्येक काम हे महत्वाचं असतं त्यामुळे प्रत्येक काम हे मन लावून करा म्हणजे मनापासून केलेल्या कामाला निभावलेल्या जबाबदारीतून सर्वोत्तम यश तुमच्या जवळ असेल यावेळी मुख्यवक्ते प्रा.नितीन बानूगडे पाटील यांचा आयआयबी बद्दल डॉक्टर्स फॅक्टरी असा गौरवपूर्ण उल्लेख आपल्या व्याखानात केला..
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.महेश पाटील यांनी केले तर त्याचबरोबर प्रा.वाकोडे पाटील यांनी आयआयबी महाफास्ट परीक्षा ची घोषणा केली. त्यातजाब प्रा. वाकोडे पाटील यांनी आयआयबी यावर्षी प्रथमच एम्स ५० या बॅच ची सुरुवात करणार असल्याचेही स्पष्ट केले. या कार्यक्रमासाठी संपूर्ण आयआयबी टिमने परिश्रम घेतले असे व्यवस्थापकीय संचालक दशरथ पाटील म्हणाले.
– कार्यक्रमास विद्यार्थी पालकांचाही प्रचंड प्रतिसाद
– विद्यार्थी व पालक मंत्रमुग्ध, भरगच्च सभागृह
– प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल विद्यार्थी पालकांनी आयआयबीचे मानले आभार
– कार्यक्रमात आयआयबी महाफास्ट ची घोषणा
तब्बल 1000 विद्यार्थ्यांना 100 % निशुल्क प्रवेश देणार
– पहिल्यांदाच एम्स 50 बॅच सुरू होणार आहे त्यामुळे एम्स साठी निवड होण्याची टक्का वाढेल असा विश्वास यावेळी आयआयबी व्यवस्थापनाने दिला
– महाफास्ट परीक्षेतील गुणांच्या आधारे विविध बॅच साठी प्रवेश मिळणार असून त्यात संकल्प मिनिसंकल्प श इतर बॅच चा समावेश असेल.
इ १२ वी साठी परीक्षा ११ डिसेम्बर २०२२ तर
इ ११ वी साठी परीक्षा २२ जानेवारी २०२३ रोजी होणार आहे
दोन्ही परीक्षांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु असून आयआयबी संकेतस्थळ www.iibedu.com यावर भेट द्यावी किंवा हेल्पलाईन वरही कॉल अथवा कार्यालयात नोंदणी करू शकता. ७३०४७३०७३०, ७३०४५६७५६७, ८०५५७३०७३०