August 19, 2022

धावती स्कुटी जळून खाक दोन महिला बचावल्या

Read Time:1 Minute, 26 Second

परभणी : परभणी- वसमत जाणा-या रस्त्यावरील महापालिकेच्या फिल्टर प्लॅटजवळ एका धावत्या स्कुटला आग लागली. अग्निशमन दलाने आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र तो पर्यंत स्कुटी जळून खाक झाली होती. दरम्यान या घटनेत दोन महिला मात्र बचावल्या आहेत.

वसमतहुन दोन महिला एका स्कुटीवर परभणीकडे येत होत्या़ गुरूवार दि़ २८ रोजी दुपारी १:४५ च्या सुमारास त्या महापालिकेच्या फिल्टर प्लॅटजवळ आल्या असता अचानक त्यांच्या स्कुटीने पेट घेतला. दरम्यान घटना घडताच गाडीवरील त्या दोन्ही महिला बाजुला झाल्या़ आजुबाजुच्या नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला़ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाचे फायरमन वसीम अखील अहमद, मदन जाधव व महेबुब भाई यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला़ मात्र तो पर्यंत ही स्कुटी जळून खाक झाली़या घटनेत दोन महिला मात्र बचावल्या असून स्कुटीचे मोठे नुकसान झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

fourteen − 5 =

Close