धनंजय मुंडे बीडसह परभणीचे पालकमंत्री

Read Time:1 Minute, 5 Second

परभणी : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर राज्य शासनाने आणखी एक जबाबदारी दिली असून, त्यांना बीड जिल्ह्यासह परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्त करण्यात आले आहे. आज या बाबतचा शासनादेश निर्गमित करण्यात आला.

दरम्यान, धनंजय मुंडे यांची परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर परभणीतील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आदींनी आनंद व्यक्त करत मुंडे यांचे स्वागत केले आहे. आमदार बाबाजानी दुर्रानी, माजी आ. विजय भांबळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश विटेकर आदींनी मंत्री मुंडे भेट घेऊन सत्कार केला. तसेच जिल्ह्याच्या विकासाबाबत एकत्र येऊन काम करण्याचे आश्वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published.

5 × four =