धक्कादायक! एसटी कर्मचार्‍याच्या मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

Read Time:2 Minute, 29 Second

एसटी कर्मचार्‍यांचे होणारे हाल दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाच्या कठीणकाळात जिवावर ऊदार होऊन मजुरांना आपल्या मुळ गावी जाण्यास मदत करणार्‍या या कर्मचार्‍यांवर आत हलाखीची परिस्थिती ओढवली आहे. वाढती महागाई आणि पगाराची अनियमितता या गोष्टींमुळे एसटी कर्मचारी मेटाकुटीला आला आहे.

अगोदरच पगार कमी आणि त्यात पगारांत अनियमितता असल्यामुळे कुटुंबाचा गाडा हाकलणे अनेकांना आव्हान झाले आहे. त्यामुळे राज्यात आता एसटी कर्मचार्‍यांच्या आत्महत्येचे सत्र सुरु झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे नाशिकातील मालेगाव येथील एका कर्मचार्‍याच्या मुलाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

अगोदरच तोडका पगार आणि तोही नियमित होत नसल्यामुळे ऊच्च शिक्षणात अडथळे येत आहे. त्यामुळे आलेल्या नैराश्यातुन मालेगावातील एसटी कर्नचार्‍याच्या मुलाने विष प्राषन करुन आत्महत्यदचा प्रयत्न केला आहे. वेळेवर ऊोचार झाल्यामुळे त्याची प्रकृती धोक्याच्या बाहेर आहे.

अहमदनगर व धुळ्यातील दोन एसटी कर्मचार्‍यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल ऊचलले आहे. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातेय. महागाई भत्त्यात वाढ या मागणीसाठी एसटी कर्मचार्‍यांनी ऊपोषणाची हाक दिली होती. शासनाने मागणी मान्य केल्यानंतर हे ऊपोषण मागे घेण्यात आले. मात्र हा अंतिम पर्याय ठरु शकत नाही. हे कर्मचार्‍यांनी आत्महत्या केल्यानंतर अधोरेखीत झाले आहे. त्यामुळे एसटी महामंडळाचे सरसकट राज्यसरकारमध्ये विलनीकरण करण्याची मागणी आता एसटी कामगार संघटनांकडून केली जातेय. काहीठिकाणी या मागणीसाठी पुन्हा एकदा संप पुकारण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eight − 2 =