दोन महिलांना 4 लाख 70 हजारांचा ऑनलाईन चुना – VastavNEWSLive.com


नांदेड(प्रतिनिधी)-हॉटेलला रेटींग दिल्यानंतर रेटींग देणाऱ्यांना कमिशन मिळेल असे आमिष दाखवून सात जणांनी 24 तासात एका महिलेला 4 लाख 69 हजार 800 रुपयांचा ऑनलाईन चुना लावला आहे.
प्रगती धनराज मस्के रा.आष्टविनायकनगर झेंडा चौक नांदेड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 20 एप्रिल 2024 च्या सकाळी 9.45 ते 21 एप्रिलच्या दुपारी 2 वाजेदरम्यान हरीषकुमार, नेहा अफ्रीन, रोशन, ज्योत्सना, विष्णुकृष्णन, दिनेश जनरलस्टोअर, शाशिनी या सर्वांचे पुर्ण नाव माहित नाही अशा लोकांनी प्रगती मस्के यांना फोन करून हॉटेल रेटींग दाबाचे आहे असे सांगत कॉल केला. हॉटेलला रेटींग दिल्यानंतर रेटींग देणाऱ्यांना कमिशन मिळेल असे आमिष दाखविले. प्रगती मस्के यांनी तसेच रेटींग दिल्यानंतर अनुक्रमे 5 हजार, 38 हजार 800, 80 हजार, 58 हजार, 90 हजार, 90 हजार, 13 हजार पैसे काढून घेतले. तसेच त्यांची मैत्रीण मृणाली बोडके यांच्या फोन पे खात्यामधून 55 हजार व 40 हजार असे एकूण 4 लाख 69 हजार 800 रुपये ऑनलाईन काढून घेतले. या बाबत विचारणा केली असता तुमचे पैसे परत होणार नाहीत असे सांगून माझी फसवणूक झाली आहे.
या प्रकरणी भाग्यनगर पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 34 आणि तंत्रज्ञान कायदा 66 (ड) नुसार अपुर्ण नावे माहिती असलेल्या सात जणांविरुध्द गुन्हा गुन्हा क्रमांक 174/2024 दाखल केला आहे. भाग्यनगरचे पोलीस निरिक्षक रमेश वाघ यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक शेंडगे यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास देण्यात आला आहे.


Post Views: 17


Share this article:
Previous Post: आमच्यामध्ये फिरणारे सुपारी कलावंत मी ओळखले आहेत; त्यांची सुपारी मी अशी फोणार की..-नाना पटोले

April 23, 2024 - In Uncategorized

Next Post: बुधवारी संध्याकाळी प्रचार तोफा थंडवणार – VastavNEWSLive.com

April 23, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.