दोन पिस्टल, जिवंत काडतुसासह दोघे जेरबंद

Read Time:3 Minute, 56 Second

पंढरपूर / प्रतिनिधी
पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने देशी बनावटीचे पिस्टल बाळगणारे दोन गुन्ह्यातील दोन देशी पिस्टल व दोन जिवंत काडतुसासह जेरबंद केले. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि मगदुम व पथक हे गुन्हे प्रतिबंध करणेकामी पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत गस्त करीत असताना शिवाजी चौक येथे आले असताना गुप्त बातमीदारामार्फत अशी माहिती मिळाली की अजय बाळकृष्ण खाडे , रा. पंढरपूर हा रिद्धी सिद्धी गणपती मंदिर , गोपाळपूर रोड येथे कमरेला हत्यार लावून थांबला असलेबाबत माहिती प्राप्त झाली . सदर माहिती पोलीस निरीक्षक अरुण पवार यांना दिली व तात्काळ माहितीची खातिर जमा करणेकामी नमुद ठिकाणी गेले असता तेथे एक इसम संशयीत रित्या फिरत असलेला दिसला त्यास त त्याची अंगझडती घेतली असता त्याचेकडे एक गावठी बनावटीचे पिस्टल मिळून आल्याने त्यास पोलीस ठाणेस आणले व पोलीस शिपाई शहाजी मंडले यांनी दिलेल्या तक्रारीवरून कलम ३.७.२५ भाहका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

तसेच गुन्हे प्रकटीकरण पथक हे अवैध धंद्यांवर कारवाई करणेकामी पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत गस्त करीत असताना गुप्त बातमीदारामार्फत गणेश रमेश शिंदे , रा . संतपेठ , पंढरपूर हा कॉलेज रोडवरील श्रीकृष्ण हॉटेल च्या समोर कमरेला हत्यार लावून थांबला असलेबाबत माहिती प्राप्त झाल्या वरून तात्काळ माहितीचा खातरजमा करणेकामी नमुद ठिकाणी गेले असता तेथे एक इसम संशयीत रित्या फिरत असलेला दिसला त्यास ताब्यात घेवून त्याची अंगझडती घेतली असता त्याचेकडे एक गावठी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे मिळुन आल्याने त्यास पोलीस ठाणेस आणले व पोलीस शिपाई शहाजी मंडले यांनी दिलेल्या तक्रारीवरून कलम ३ , ७ , २५ भाहका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला .

सदरची कामगीरी ही पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते , अपर पोलीस अधिक्षक ंिहमतराव जाधव,उपविभागीय अधिकारी विक्रम कदम व पोलीस निरीक्षक अरुण पवार यांचे मार्गदर्शनाखाली , गुन्हे प्रकटीकरण पाखेचे सपोनि राजेंद्र सपोफी राजेश गोसावी , पोहेकॉ / 1063 बिपीनचंद्र ढेरे , पोहेकॉ / 181 इरफान मुलाणी , पोहेकॉ / 419 शरद कदम , पोहेकॉ / 396 सुरज हॅबाडे , पोना / 1005 पोएब पठाण , पोना / 562 लोहार , पोना / 484 सुनिल बनसोडे , पोना / 1228 सुजित जाधव , पोकॉ / 2190 समाधान माने , पोकॉ / 31 कपिल माने , पोकॉ / 407 विनोद पाटील , पोकॉ / 1216 शहाजी मंडले पोकॉ / 1315 अर्जून केवळे यांनी केली असून सदर गुन्हयांचा पुढील तपास सहा . पोलीस निरीक्षक , राजेंद्र मगदुम करीत आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

2 + eleven =