दोनच महिन्यात बियाणी कुंटूबात आर्थिक कलह उफाळला

Read Time:4 Minute, 19 Second

नांदेड : बांधकाम व्यवसायीक संजय बियाणी यांची हत्या होऊन अवघे दोनच महिने होत आहेत़ अजून पोलिस तपासही पुर्ण झाला नाही़ तोच बियाणी कुंटूबात आर्थिक कलह उफाळला आहे़ बियाणी यांच्या पत्न अनिता बियाणी यांनी आपले दीर प्रविण बियाणी विरुध्द हिशोबाची हार्ड डिस्क चोरल्याची तक्रार दिली आहे. यावरून विमानतळ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे़ यामुळे बियाणी कुंटूब पुन्हा चर्चेत आले आहे़.

राज्यभरात खळबळ उडवून देणारे बांधकाम व्यवसायीक संजय बालाप्रसाद बियाणी यांचे हत्याकांड दि़ ५ एप्रिल रोजी घडले होते़ दोन बंदुकधारी मारेक-यांनी अकरा गोळ्या झाडून बियाणी यांची त्यांच्याच घरासमोर हत्या केली होती. या प्रकरणी त्यांची पत्नि अनिता संजय बियाणी यांच्या तक्रारीवरुन विमानतळ पोलीसांनी कलम ३०२, ३०७, ३४ आणि ३/२५ हत्यार कायदा असा गुन्हा दाखल केला़

पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, पोलिस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांच्या मार्गदर्शंनाखाली या गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले. हत्याकांडाच्या तपासासाठी सहा राज्याचा प्रवास आणि परदेशात चार ठिकाणी पत्र व्यवहार संजय बियाणी यांच्या हत्याकांडाचा उलगडा झाला़ या प्रकरणात आत्तापर्यंत टप्प्याने नऊ आरोर्पीना गजाआड करण्यात आले असून सध्या ते कोठडीची हवा खात आहेत़ तर पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांनी हे हत्याकांड कट रचुनच झाले,

यामुळे कलम १२० (ब) वाढविण्यात आले असून या कटात अनेकांचा सहभाग आहे़ त्या आरोपींना सुद्धा गजाआड करू असे सांगीतले होते़ यानूसार पुढील तपास सुरूच आहे़ बांधकाम व्यवसायीक संजय बियाणी यांची हत्या होऊन अवघे दोनच महिने होत आहेत़ अजून पोलिस तपासही पुर्ण झाला नाही़ तोच बियाणी कुंटूबात भावयजी व दिरात आता आर्थिक कलह उफाळून आला आहे़

संजय बियाणी यांच्या पत्नी अनिता संजय बियाणी यांनी आपले दीर प्रवीण बालाजीप्रसाद बियाणी यांनी अनिता बियाणीच्या मालकीचे राज मॉल येथील फायनान्स ऑफिसमधून तोशिबा कंपनीची १ टीबी क्षमतेचा संपूर्ण आर्थिक व्यवहाराची माहिती असलेला हार्ड डिस्क चोरून घेऊन नेला आहे. अशी तक्रार विमानतळ पोलिस ठाण्यात दिली आहे़ या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा क्रमांक १९५/२०२२ कलम ४३ ब ६६ तंत्रज्ञान कायदा आणि ३८० भारतीय दंड संहीता प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

यामुळे बियाणी हत्याकांड पुन्हा एकदा चर्चेत आले आहे़ या प्रकणातील संशयित आरोपी प्रवीण बियाणी हे गुन्हा दाखल होण्या अगोदरपुर्वी छातीत त्रास होत असल्याच्या कारणाहून शहरातील विवेकानंद हॉस्पीटल येथे उपचार घेत आहेत. खबरदारी म्हणून विमानतळ पोलीसांनी हॉस्पीटलमध्ये पोलिस गार्ड तैनात केला आहे. आता हे प्रकरण आणखी काय काय वळण घेईल याची चर्चा सुरू झाली आहे़.

Leave a Reply

Your email address will not be published.

fourteen − 9 =