January 19, 2022

देशात धोका कायम

Read Time:2 Minute, 54 Second

नवी दिल्ली : गेल्या २४ तासांत देशात १९,७४० जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या २ लाख ३६ हजार ६४३ वर पोहोचली. तर गेल्या काही दिवसांच्या तुलनेत काल दिवसभरातल्या कोरोनाबाधितांच्या संख्येत काहीशी घट झाल्याचे चित्र आहे.

देशातली उपचाराधीन रुग्णांची संख्या २ लाख ३६ हजार ६४३ वर पोहोचली असून ती एकूण कोरोनाबाधितांच्या प्रमाणापेक्षा एक टक्क्यांहूनही कमी आहे. हा आकडा २०६ दिवसांतला सर्वात कमी आहे. तर, एकूण ३,३२,४८,२९१ रुग्ण आतापर्यंत बरे झाले असून, हे प्रमाण ९७.९८ टक्के इतके आहे. देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लशींच्या ९४ कोटींहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत. गेल्या २४ तासांत लस टोचून घेतलेल्या नागरिकांची संख्या ७९ लाख १२ हजार २०२ वर पोहोचली आहे.

कोरोनाच्या संभाव्य तिस-या लाटेला रोखण्यासाठी आजपासून ते १४ ऑक्टोबर दरम्यान राज्यात कवच कुंडले योजना राबविली जाणार आहे आणि त्यात किमान एक कोटी लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, सर्वांना किमान पहिली मात्रा दिली गेल्यावर कोरोनाच्या तिस-या लाटेचा धोका कमी होईल, असा विश्वास आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी व्यक्त केला.

दररोज किमान १५ लाख लसीकरण
केंद्र सरकारने दस-यापर्यंत देशात एकूण १०० कोटी लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवले असून त्यादृष्टीने राज्यात सात दिवसांमध्ये दररोज किमान १५ लाख लसीकरण करून या कालावधीत एक कोटी लसीकरण केले जाईल. राज्य सरकारकडे सध्या ७५ लाख लसींचा साठा उपलब्ध असून आणखी २५ लाख लसी गुरुवारी मिळणार आहेत. आता लसींचा तुटवडा नाही, असे टोपे यांनी सांगितले. कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याचे सरकारचे उद्दिष्ट असून त्यासाठी कवच कुंडले ही योजना जाहीर करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

five × 2 =

Close