May 19, 2022

देशात तिमाहीत १४० टन सोने विक्री

Read Time:2 Minute, 32 Second

मुंबई : सोन्याच्या किमतीत झालेल्या घसरणीचा ग्राहकांनी चांगलाच फायदा उचलला आहे. जानेवारी ते मार्च या तिमाहीत १४० टन सोन्याची विक्री झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विक्रीत ३७ टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षी जानेवारी ते मार्च २०२० या काळात १०२ टन सोने विक्री झाली होती. सोने विक्रीचे एकूण मूल्य पाहता जानेवारी ते मार्च २०२१ या तिमाहीत ५८८०० कोटीचे सोने देशभरात विक्री झाले, तर गेल्या वर्षी याच कालावधीत ३७५८० कोटीची सोने विक्री झाली होती.

वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या गोल्ड डिमांड ट्रेंडस् अहवालानुसार जानेवारी ते मार्च या काळात देशात १०२ टन दागिन्यांची विक्री झाली, तर गेल्या वर्षी याच काळात ७३.९ टन दागिन्यांची विक्री झाली होती. जागतिक बाजाराचा विचार केला तर पहिल्या तिमाहीत सोन्याची एकूण मागणी ८१५.७ टन होती. त्याआधीच्या तिमाहीत जवळपास इतकीच मागणी होती. मात्र, सोनेआधारित ईटीएफचा आऊटफ्लो १७७.९ टन झाल्याने मागील वर्षीच्या या काळाच्या तुलनेत मागणीत लक्षणीय (२३ टक्के) घट झाली. याच तिमाहीत सोन्यातील गुंतवणुकीची मागणी घटली आहे.

सोन्याची बिस्किटे आणि नाण्यांची मागणी वाढल्याने ईटीएफच्या मागणीतील घटीचा हा परिणाम कमी झाला. अशा रीटेल स्वरुपातील सोन्याची खरेदी ३३९.५ टनांवर पोहोचली (मागील वर्षीच्या तुलनेत ३६ टक्क्यांनी अधिक). किमतींच्या आधारे तोलून-मापून बार्गेन करणे आणि वाढत्या महागाईची चिंता ही यामागील मुख्य कारणे होती, असे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published.

one × two =

Close